पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी हरियाणातील जिंद इथे विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी समारंभातील क्षणचित्रे समाज माध्यमावर केली सामायिक

प्रविष्टि तिथि: 17 JUL 2026 9:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,17 जुलै 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणातील जिंद इथे विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केल्याच्या समारंभातील क्षणचित्रे समाज माध्यमावर सामायिक  केली आहेत. समारंभाच्या स्थळी आगमन झाल्यानंतर आनंद व्यक्त करताना, पंतप्रधानांनी या प्रदेशाच्या समृद्ध ऐतिहासिक, शौर्यपूर्ण आणि आध्यात्मिक वारशाचा उल्लेख केला. शक्तीपीठ माता जयंती यांच्या आशीर्वादाने पावन झालेल्या या भूमीचे वैशिष्ट्य त्यांनी अधोरेखित केले.

समाज माध्यमावरील संदेशांच्या मालिकेत मोदी म्हणाले,

भारताने हरित गतिशीलतेच्या दिशेने एक मोठी झेप घेतली आहे!

जिंद–सोनीपत दरम्यान भारतातील पहिल्या हायड्रोजनवर धावणाऱ्या स्वदेशी रेल्वे गाडीला जिंद इथे हिरवा झेंडा दाखवला.

ही उल्लेखनीय कामगिरी भारतीय रेल्वेच्या सांघिक कल्पकतेचे आणि समर्पणाचे प्रतिबिंब आहे. आत्मनिर्भर भारताचे तसेच स्वच्छ आणि भविष्याभिमुख परिवहन व्यवस्थेप्रती आपल्या वचनबद्धतेचे हे एक अभिमानास्पद प्रतीक आहे.

हरियाणातील जिंद इथे देशातील हायड्रोजनवर चालणाऱ्या पहिल्या रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवताना मला अत्यंत अभिमान वाटला. स्वच्छ, हरित आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीच्या दिशेने हे एक मोठे यश आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ही रेल्वे गाडी केवळ भारताच्या तांत्रिक क्षमतेचे प्रतीक नव्हे; तर संपूर्ण जगासाठीही एक आदर्श आहे.

जिंद इथल्या विकास कार्यक्रमात हरियाणातील आपल्या  कुटुंबियांनी दाखविलेल्या उत्साहामुळे नवी ऊर्जा मिळाली.

जिंद ते सोनीपत दरम्यान सुरू झालेली देशातील पहिली हायड्रोजन रेल्वे गाडी ही 21व्या शतकातील तंत्रज्ञानाच्या दिशेने भारताने टाकलेले एक मोठे पाऊल आहे. या रेल्वेच्या सामर्थ्याविषयी ऐकल्यावर प्रत्येक भारतीयाला नक्कीच अभिमान वाटेल!

आज जर 2014 पूर्वीची परिस्थिती असती; तर जागतिक इंधन संकटामुळे भारताची रेल्वे व्यवस्था ठप्प झाली असती. मात्र, आमचे सरकार दूरदृष्टीने विचार करते आणि समस्यांवरील उपायही प्रत्यक्षात उतरविते. त्याचेच सकारात्मक परिणाम आज देश अनुभवत आहे.

हरियाणातील डबल इंजिन सरकार क्रीडा क्षेत्रातही इथल्या मुला-मुलींना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत आहे. आगामी महत्त्वाच्या स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील माझ्या युवा मित्र-मैत्रिणींना माझी ही विशेष विनंती आहे. 

निलीमा चितळे/रेश्मा बेडेकर/प्रिती मालंडकर

 

   सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2285981) आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam