इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
डिजिटल इंडिया भाषिणी विभाग आणि पंजाब नॅशनल बँक यांच्यात सर्वसमावेशक बँकिंगसाठी बहुभाषिक कृत्रिम बुद्धिमत्तेला प्रोत्साहन देणारा सामंजस्य करार
प्रविष्टि तिथि:
15 JUL 2026 8:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,15 जुलै 2026
भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत कार्यरत डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन (डीआयसी) च्या डिजिटल इंडिया भाषिणी विभाग (डीआयबीडी) आणि पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) यांनी भाषिणी फॉर सेवा / संचलन या उपक्रमांतर्गत सर्वसमावेशक बँकिंग आणि नागरिक-केंद्रित वित्तीय सेवा यांसाठी बहुभाषिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) पर्यायांना चालना देण्यासाठी सहयोगाच्या उद्देशाने सामंजस्य करार केला आहे.

या सामंजस्य करारावर डीआयबीडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ नाग आणि पीएनबीच्या डिजिटल बँकिंग ट्रान्सफॉर्मेशन विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक (डिजिटल) अतिश कुमार राऊत यांनी सह्या केल्या.
भाषिणीच्या स्वदेशी बहुभाषिक एआय व्यवस्थेचा उपयोग करून पंजाब नॅशनल बँकेच्या डिजिटल बँकिंग व्यवस्थेत एआय-आधारित भाषा तंत्रज्ञानाचा समावेश करणे आणि त्याआधारे भाषा-समावेशक बँकिंग सेवा देणे या उद्देशाने हा करार केला आहे. या भागीदारीमुळे ग्राहकांना त्यांच्या पसंतीच्या भारतीय भाषांमध्ये बँकिंगविषयक माहिती, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि विविध सेवांचा लाभ घेता येईल. त्यामुळे बँकिंग अधिक सुलभ, सहज आणि सर्वसमावेशक होईल, तसेच ग्राहकांना अधिक सोयीस्कर अनुभव आणि वित्तीय समावेशनाला चालना मिळण्यास मदत होईल.

या भागीदारीमुळे बँकिंग क्षेत्रात बहुभाषिक एआयचा स्वीकार अधिक वेगाने होणे अपेक्षित आहे. तसेच एआय-आधारित वित्तीय सेवांमधील नवोन्मेषाला चालना मिळेल. प्रत्येक ग्राहकाला आपल्या पसंतीच्या भाषेत आत्मविश्वासाने व्यवहार करता येईल, अशा सुलभ, नागरिक-केंद्रित डिजिटल बँकिंग सेवांच्या विकासाला बळ मिळेल.
माधुरी पांगे/रेश्मा बेडेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2285121)
आगंतुक पटल : 9