आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
आरोग्यसेवेतील गुणवत्ता, नावोन्मेष आणि नियमानातील सर्वोत्कृष्टता अधिक मजबूत करण्यासाठी भारतीय औषधकोष आयोगाने (इंडियन फार्माकोपिया कमिशन – आयपीसी) ‘उत्तर प्रदेश प्रमोट फार्मा कौन्सिल’ (युपीपीपीसी) सोबत केला सामंजस्य करार
औषधनिर्माण आणि वैद्यकीय उपकरण परीसंस्थेला चालना देणे, रुग्णांच्या सुरक्षिततेत सुधारणा करणे आणि डिजिटल अहवाल साधनांच्या माध्यमातून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) आधार देणे हा या धोरणात्मक भागीदारीचा उद्देश आहे
उत्तर प्रदेशला आरोग्य सेवा देणारे अग्रगण्य केंद्र बनवण्यासाठी गुणवत्ता आणि नवोन्मेषाला चालना देण्याकरीता आयपीसी आणि युपीपीपीसी यांची भागीदारी
प्रविष्टि तिथि:
15 JUL 2026 11:30AM by PIB Mumbai
आरोग्य सेवेतील उच्च गुणवत्तेची मानके अधिक उन्नत करण्यासाठी आणि नियामक चौकटी अधिक बळकट करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाउल म्हणून, भारतीय औषधकोष आयोग (आयपीसी) ने 'उत्तर प्रदेश प्रमोट फार्मा कौन्सिल (युपीपीपीसी) सोबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. ग्रेटर नोएडा येथील इंडिया एक्स्पो मार्ट येथे 14 जुलै 2026 रोजी आयोजित YEIDA ‘मेडटेक इन्व्हेस्टर्स मीट अँड साइट व्हिजिट 2026’ दरम्यान या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
या धोरणात्मक सहकार्याचा उद्देश, या क्षेत्रातील गुणवत्ता मानके, नियामक सर्वोत्कृष्टता, नवोन्मेष आणि क्षमता बांधणी यांना प्रोत्साहन देऊन औषध निर्माण आणि वैद्यकीय उपकरणे क्षेत्रातील परिसंस्था बळकट करणे हा आहे.

या भागीदारीद्वारे, आयपीसी आणि युपीपीपीसी पुढील बाबींसाठी एकत्रितपणे काम करतील:
- औषधनिर्माण आणि वैद्यकीय उपकरणे उद्योगांमधील गुणवत्ता मानके आणि नियामक अनुपालनात अधिक सुधारणा करणे.
- इंडियन फार्माकोपिया, फार्माकोव्हिजिलन्स (औषधांच्या सुरक्षिततेचे विज्ञान) आणि मटेरिओव्हिजिलन्स (वैद्यकीय उपकरणांमुळे रुग्णांना होणारे दुष्परिणाम) यांविषयी जागरूकता वाढवणे.
- संयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा आणि हितधारक जागरूकता उपक्रम आयोजित करणे.
- संशोधन, नवोन्मेष आणि उद्योग-शैक्षणिक सहकार्याला चालना देणे.
- प्रतिकूल घटनांच्या अहवाल नोंदणीसाठी डिजिटल साधने पुरवून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सहाय्य करणे.
- गुणवत्तेची हमी आणि उत्पादन बाजारपेठेत आल्यानंतरची उत्पादनावर देखरेख या उपक्रमांद्वारे रुग्णांच्या सुरक्षिततेत वाढ करणे.
या सामंजस्य करारातून, उच्च-गुणवत्तेच्या आरोग्यसेवा मानकांना पुढे नेणे, नवोन्मेषाला पाठिंबा देणे आणि भारताची नियामक चौकट मजबूत करणे याप्रती आयपीसीची निरंतर वचनबद्धता प्रतिबिंबित होते, तसेच हा करार औषधनिर्माण, वैद्यकीय उपकरणे आणि आरोग्यसेवा तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तर प्रदेशला एक प्रमुख केंद्र म्हणून विकसित होण्यास हातभार लावतो.
***
AshishSangle / SavitaMhaskar / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2284730)
आगंतुक पटल : 21