श्रम आणि रोजगार मंत्रालय
केंद्रीय श्रम मंत्री डॉ मनसुख मांडवीया यांच्या हस्ते हैदराबाद इथे 15 व्या ब्रिक्स व्यापार संघटना मंच शिखर परिषदेचे उद्घाटन
सामाजिक न्याय, जबाबदार नवोन्मेष आणि सर्वसमावेशक सामाजिक संरक्षणाने प्रेरित मानव-केंद्री अशा भविष्यातील कामाचे नियोजन करण्याचे आवाहन
प्रविष्टि तिथि:
14 JUL 2026 6:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जुलै 2026
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांच्या हस्ते आज हैदराबाद इथे 15 व्या ब्रिक्स व्यापार संघटना मंच शिखर परिषद 2026 चे उद्घाटन झाले. यावेळी मांडवीय यांनी कामगार-केंद्री जागतिक व्यवस्था उभारण्याचे आवाहन केले. अशी व्यवस्था ज्यात, सामाजिक न्याय, जबाबदार नवोन्मेष आणि मानवी प्रतिष्ठा राखण्यासाठीची साधने म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता येईल.
ब्रिक्स सदस्य देशातील प्रतिनिधींना संबोधित करतांना मांडवीय म्हणाले, की कर्मचाऱ्यांचे अधिकार सुरक्षित ठेवणे, औद्योगिक सौहार्द बळकट करणे आणि सामाजिक न्याय जपत वित्तीय प्रगती होणे सुनिश्चित करण्यात, कामगार संघटनांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. सरकारने केलेल्या कामगार सुधारणा अधोरेखित करत, मांडवीय यांनी सांगितले, की या सुधारणांमुळे, कामगारांना जागतिक मानकांनुसार किमान वेतनाची हमी, नियुक्तीपत्रे, कार्यालयीन स्थळी सुरक्षिततेच्या व्यवस्थेत सुधारणा आणि आरोग्याची काळजी, डिजिटल अनुपालन प्रणाली आणि पहिल्यांदाच, गिग वर्कर आणि फलाटावरील हमाल यांना या सुधारणांमुळे ओळख मिळाली आहे.

श्रम क्षेत्रातील नियमनात आमूलाग्र सुधारणा करण्यासाठी, भारताने डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा लाभ घेतला आहे, असेही डॉ मांडवीय यांनी सांगितले. ई- श्रम पोर्टलवर आतापर्यंत 317 दशलक्ष असंघटित कामगारांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली, या नोंदणीमुळे, त्यांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येत आहे. तर, रोजगार शोधणारे, रोजगार देणाऱ्या कंपन्या, करियर केंद्रे आणि प्रशिक्षण यांना राष्ट्रीय करियर सेवा पोर्टलने परस्परांशी जोडले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
भारताच्या सामाजिक सुरक्षा व्यवस्थेचा उल्लेख करत मांडवीय यांनी सांगितले की, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना, आठ कोटींहून अधिक सक्रिय सदस्य आणि 80 लाख निवृत्तीवेतनधारकांसह जगातील सर्वात मोठ्या सामाजिक सुरक्षा संस्थांपैकी एक आहे. तसेच कर्मचारी राज्य विमा महामंडळाद्वारे 15 कोटींहून अधिक विमाधारक व्यक्ती आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना आरोग्यसेवा तसेच सामाजिक सुरक्षा लाभ दिले जातात, असेही त्यांनी सांगितले.
9GNC.jpeg)
भारतातील सामाजिक सुरक्षा योजनांची व्याप्ती, 2015 साली 19 टक्के होती, ती आता 2025 मध्ये 64.3 टक्क्यांपर्यंत वाढली असून, त्यात सुमारे 94 कोटी लोकांचा समावेश होतो, असेही त्यांनी संगितले. रोजगार निर्मितीबद्दल बोलतांना, गेल्या दशकभरात देशात, 17 कोटींच्या रोजगाराच्या संधी तयार करण्यात आल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
ब्रिक्स देशांमध्ये जगाच्या जवळपास निम्म्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व असून जगातील सर्वात मोठ्या कामगारशक्तींपैकी एक या देशांकडे आहे, असे मांडवीय म्हणाले. सामाजिक सुरक्षा, कामगारांचे जाणे-येणे, कौशल्य विकास, कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशासन आणि सन्मानजनक रोजगार यांसारख्या क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य वाढविण्याची मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले. या मंचावरील येणाऱ्या शिफारशी, आगामी ब्रिक्स कामगार व रोजगार मंत्र्यांच्या बैठकीस उपयुक्त ठरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
त्याआधी, ब्रिक्स व्यापारी संघटना मंच शिखर परिषद 2026 चे अध्यक्ष आणि भारतीय मजदूर संघ चे राष्ट्रीय अध्यक्ष सुंकारी मल्लेशम यांनी सांगितले की, कामगारांचे कल्याण आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देणे या उद्देशाने ब्रिक्स देशांमधील सहकार्य वाढविण्यासाठी ही शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे.

ब्रिक्स देशांतील प्रतिनिधी या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी झाले होते. भारतीय मजदूर संघाच्या आयोजनाखाली होत असलेल्या या तीन दिवसीय शिखर परिषदेत 50 हून अधिक आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी तसेच भारतीय कामगार संघटना, कामगार क्षेत्रातील तज्ज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञांचे सुमारे 70 प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. पुढच्या दोन दिवसांत, चर्चासत्रांमध्ये सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा आणि लाभांची हस्तांतरणीयता, मानवकेंद्री तंत्रज्ञान आणि जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता, भविष्यातील कामकाजाच्या स्वरूपासाठी कौशल्य विकास, तसेच बदलत्या व्यावसायिक जगात महिलांची भूमिका या चार विषयांवर सखोल चर्चा होणार आहे.
* * *
सुषमा काणे/राधिका अघोर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2284596)
आगंतुक पटल : 14