संरक्षण मंत्रालय
लोकायन 26 - अमेरिकेतील बोस्टन येथे आयोजित 'ग्रँड परेड ऑफ सेल्स'मध्ये भारतीय नौदलाचे 'सुदर्शिनी' हे प्रशिक्षण जहाज झाले सहभागी
प्रविष्टि तिथि:
13 JUL 2026 2:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जुलै 2026
न्यूयॉर्क येथील Sail4th 250 संचलनात यशस्वी सहभाग घेतल्यावर, भारतीय नौदलाचे शिडांचे प्रशिक्षण जहाज आयएनएस सुदर्शिनी 12 जुलै 2026 रोजी बोस्टन येथे पोहोचले. या जहाजाने 'ग्रँड परेड ऑफ सेल्स' मध्ये भाग घेतला. या संचलनाने 'सेल बोस्टन 2026' ची सुरुवात झाली.
ग्रँड परेड ऑफ सेल्स आणि जहाजाच्या बोस्टन मधील समारंभपूर्वक प्रवेशाच्या वेळी बोस्टन येथील भारताचे महावाणिज्य दूत रघुराम शास्त्री यांनी आयएनएस सुदर्शिनीमधून सफर केली. भारतीय तिरंगा अभिमानाने फडकवत, आयएनएस सुदर्शिनीने बोस्टन फिश पिअर येथे नांगर टाकण्यापूर्वी कॅसल आयलंड आणि सीपोर्ट डिस्ट्रिक्ट यांसारख्या प्रमुख ऐतिहासिक स्थळांना ओलांडले.
20 हून अधिक देशांतील 60 पेक्षा जास्त महाकाय जहाजांच्या आंतरराष्ट्रीय ताफ्यात सहभागी होत, आयएनएस सुदर्शिनी तिच्या सुरू असलेल्या 'लोकायन 2026' या महासागर पार करणाऱ्या मोहिमेदरम्यान सागरी सदिच्छादूत म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. सागरी मुत्सद्देगिरी, आंतरराष्ट्रीय सद्भावना आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीप्रति भारतीय नौदलाच्या वचनबद्धतेला बळकट करत, हे जहाज 12 ते 15 जुलै 2026 या कालावधीत अभ्यागतांसाठी खुले राहील.
नॉरफोक, बाल्टिमोर आणि न्यू यॉर्क येथील यशस्वी बंदर भेटींनंतर, 'सेल बोस्टन 2026' मधील आयएनएस सुदर्शिनीचा सहभाग भारत-अमेरिका यांच्यातील वाढत्या सागरी भागीदारीला अधिक बळकटी देत आहे आणि जागतिक स्तरावर भारताच्या समृद्ध सागरी वारशाचे दर्शन घडवत आहे.
(4)0VSA.jpeg)
(2)OAW0.jpeg)
(2)V61B.jpeg)
* * *
अंबादास यादव/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2284065)
आगंतुक पटल : 10