वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल 13 ते 17 जुलै 2026 दरम्यान स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावर उच्चस्तरीय व्यापार शिष्टमंडळाचे करणार नेतृत्व
प्रविष्टि तिथि:
12 JUL 2026 2:41PM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल 13 ते 17 जुलै 2026 दरम्यान स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावर एका उच्चस्तरीय भारतीय व्यापार शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहेत. युरोपमधील देशांबरोबर व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि शाश्वत विकास या क्षेत्रात आर्थिक भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेवर या दौऱ्यात भर दिला जाणार आहे.
या शिष्टमंडळात प्रगत उत्पादन, स्वच्छ ऊर्जा, डिजिटल तंत्रज्ञान, रत्ने आणि आभूषणे, अन्न प्रक्रिया, आरोग्य सेवा आणि डिझाइन यांसारख्या क्षेत्रांतील आघाडीच्या भारतीय कंपन्यांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.
स्पेन दौरा 13 जुलै
स्पेन भेटीत, मंत्री गोयल द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यावर भर देतील. तसेच, प्रस्तावित भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करारातून निर्माण होणाऱ्या संधींचा लाभ घेण्यावर लक्ष केंद्रित करतील.
ते भारतातील गुंतवणुकीच्या संधी प्रदर्शित करण्यासाठी आणि व्यापार ते व्यापार भागीदारीला प्रोत्साहन देण्यासाठी, आघाडीच्या स्पॅनिश कंपन्या आणि उद्योग संघटनांसोबत एका भारत-स्पेन व्यापार गोलमेज परिषदेचे अध्यक्षपदही भूषवतील.
बेल्जियम भेट 14 आणि 15 जुलै
बेल्जियम दौऱ्यात गोयल अँटवर्प बंदर आणि अँटवर्प वर्ल्ड डायमंड सेंटरला भेट देतील.
यावेळी होणाऱ्या भारत–युरोपियन संघ व्यापार गोलमेज परिषद तसेच व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेच्या पूर्ण सत्रात थेट परकीय गुंतवणूक, व्यापार सुलभीकरण, शाश्वत तंत्रज्ञान आणि सक्षम पुरवठा साखळी या विषयांवर चर्चा होईल.
ब्रुसेल्समध्ये मंत्रीस्तरीय बैठक
ब्रुसेल्समध्ये परराष्ट्र मंत्री तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री यांच्या समवेत गोयल, भारत–युरोपियन संघ व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेच्या तिसऱ्या मंत्रीस्तरीय बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवतील.
***
सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2283912)
आगंतुक पटल : 10