पंतप्रधान कार्यालय
व्हिएतनाममधील फु क्वॉकजवळ भारतीय नागरिक प्रवास करत असलेल्या बोटीच्या अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दुःख
Posted On:
11 JUL 2026 7:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जुलै 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिएतनाममधील फु क्वॉकजवळ भारतीय नागरिकांचा समावेश असलेल्या दुःखद बोट अपघाताबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
या अपघातात ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याप्रती पंतप्रधानांनी सहवेदना व्यक्त केल्या आणि जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना केली.
भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावास सर्वतोपरी मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भारतीय अधिकारी व्हिएतनामच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या निरंतर संपर्कात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
एक्स या समाज माध्यमावरील एका संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“व्हिएतनाममधील फु क्वॉकजवळ भारतीय नागरिकांचा समावेश असलेल्या बोट अपघाताची दुःखद बातमी ऐकून अत्यंत वेदना झाल्या.
ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना. अपघातातून बचावलेल्या जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे अशी प्रार्थना.
भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावास सर्वतोपरी मदत करत आहेत. भारतीय अधिकारी व्हिएतनामच्या अधिकाऱ्यांच्याही संपर्कात आहेत.”
* * *
राधिका अघोर/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2283756)
अभ्यागत कक्ष : 49
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam