पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी धैर्य आणि चिकाटीचे महत्त्व सांगणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक
प्रविष्टि तिथि:
08 JUL 2026 7:48AM by PIB Mumbai
धैर्य, ही कुठल्याही राष्ट्राची सर्वात मोठी शक्ती आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. यामुळे कठीण आव्हानांमध्येही देशाला एकजूट राखण्याची आणि प्रगती, समृद्धी व आत्मनिर्भरतेच्या दिशेने निरंतर वाटचाल करण्याची प्रेरणा मिळते, असे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे -
“चलन्ति गिरयः कामं युगान्तपवनाहताः।
कृच्छ्रेऽपि न चलत्येव धीराणां निश्चलं मनः।। ”
हे सुभाषित सांगते की, प्रलयकाळी प्रचंड वादळी वाऱ्यांच्या तडाख्याने पर्वतही हादरू लागतात, धैर्यवान व्यक्तीचे मन मात्र संकटाच्या काळातही अविचल आणि शांत राहते.
पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले आहे;
''धैर्य, ही कुठल्याही राष्ट्राची सर्वात मोठी शक्ती आहे. यामुळे कठीण आव्हानांमध्येही देशाला एकजूट राखण्याची आणि प्रगती, समृद्धी व आत्मनिर्भरतेच्या दिशेने निरंतर वाटचाल करण्याची प्रेरणा मिळते.
चलन्ति गिरयः कामं युगान्तपवनाहताः।
कृच्छ्रेऽपि न चलत्येव धीराणां निश्चलं मनः।।”
***
NehaKulkarni / SonaliKakde / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2282393)
आगंतुक पटल : 9