पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी गुजरातच्या साणंद येथील 'सीजी सेमी'च्या (CG Semi) 'आउटसोर्स्ड सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट' (OSAT) सुविधेच्या उद्घाटनाची क्षणचित्रे सामायिक केली

प्रविष्टि तिथि: 04 JUL 2026 9:48PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  आज गुजरातमधल्या साणंद येथील सीजी सेमीच्या (CG Semi) 'आउटसोर्स्ड सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट' (OSAT) सुविधेचे उद्घाटन केले. या प्रसंगाचे महत्व अधोरेखित करताना, पंतप्रधान म्हणाले की,
या सुविधेचे अनावरण म्हणजे आपल्या उद्दिष्टांप्रती देशाच्या असलेल्या आढळ वचनबद्धतेची साक्ष आहे. 

देश सातत्याने आपले दृढ संकल्प कोणत्याही परीस्थितीत मूर्त स्वरूपात आणतो, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

(X) एक्स या समाज माध्यमांवर प्रसारित केलेल्या अनेक संदेशातून या प्रसंगांची क्षणचित्रे सामायिक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले:

 

सीजी सेमीच्या (CG Semi) 'आउटसोर्स्ड सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट' (OSAT) सुविधेचे उद्घाटन करण्यासाठी साणंद मध्ये पुन्हा येणे आनंददायी होते. यामुळे भारताला सेमीकंडक्टर आणि भविष्यकालीन तंत्रज्ञानाचे मुख्य केंद्र बनवण्याच्या आमच्या प्रयत्नांना चालना मिळेल.

साणंद मध्ये सुरु झालेला सीजी सेमीचा (CG Semi) प्रकल्प हा, तंत्रज्ञान, विश्वास आणि भागीदारीचा एक आदर्श आहे, जो भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्रातील प्रवासाला नवी गती प्रदान करतो.

सेमीकंडक्टर इलेक्ट्रॉनिक्स क्रांतीतील पुढचं पाउल आहे. यामुळे आपण मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या बरोबरीनेच, संपूर्ण जगाला चालना देणाऱ्या अशा चिप्सचेही उत्पादन करू शकतो.

सेमीकंडक्टर आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) या क्रांतिकारी युगात, माझ्या तरुण मित्रांना माझे एक विशेष आवाहन आहे.

***
शिल्पा पोफळे/सविता म्हसकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2281206) आगंतुक पटल : 21
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam