पंतप्रधान कार्यालय
अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या 250 व्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधानांच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
04 JUL 2026 9:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली: 04 जुलै 2026
अमेरिकेच्या स्वातंत्र्याला 250 वर्षे पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक घटनेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प आणि अमेरिकेच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी आपल्या संदेशात भारत-अमेरिका यांच्यातील कायम टिकून असलेल्या भागीदारीची ताकद अधोरेखित केली आहे. या दोन लोकशाही देशांमधील संबंध धोरणात्मक भागीदारीच्याही पलीकडचे असून, ते दोन्ही देशांची समान लोकशाही मूल्ये, कायद्याचे राज्य आणि आपापल्या जनतेच्या अफाट क्षमतेवरील विश्वास या पायावर आधारलेले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
पंतप्रधानांनी 'एक्स'वरील संदेशात सांगितले:
तुमच्या स्वातंत्र्याच्या 250 व्या वर्धापनदिनाच्या ऐतिहासिक प्रसंगानिमित्त 1.4 अब्ज भारतीयांच्या वतीने, मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि अमेरिकेच्या जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध धोरणात्मक भागीदारीच्याही पलीकडचे आहेत. लोकशाही, कायद्याचे राज्य आणि आपल्या देशातील नागरिकांची अफाट क्षमता यांवरील विश्वास हा आपल्यातील सामायिक धागा आपल्या मैत्रीला जगाच्या हिताची एक प्रभावी शक्ती बनवतो.
यापुढील 250 वर्षे अमेरिकेला अधिक समृद्धीची, शांततेची आणि प्रगतीची तसेच भारत-अमेरिका भागीदारीला नव्या उंचीवर नेणारी ठरोत.
***
शैलेश पाटील/मंजिरी गानू/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2281180)
आगंतुक पटल : 39
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam