पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी अमरनाथ यात्रेकरूंना लिहिले पत्र; यात्रेत पाच संकल्प करण्याचे केले आवाहन

प्रविष्टि तिथि: 03 JUL 2026 3:53PM by PIB Mumbai


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वार्षिक अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांची ही तीर्थयात्रा सर्वार्थाने सुरक्षित आणि मंगलमय होवो, अशी कामना व्यक्त केली आहे. बाबा बर्फानी यांच्या दर्शनाशी जोडलेली अमरनाथ यात्रा आपल्या आध्यात्मिक परंपरेचा आणि सांस्कृतिक एकतेचा एक शाश्वत अध्याय आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे.
त्यांनी यात्रेकरूंना एक पत्र लिहिले असून, त्यामध्ये या पवित्र यात्रेचा संबंध पाच संकल्पांशी जोडला आहे.
पंतप्रधानांनी 'X' वर पोस्ट केले:
"बाबा बर्फानी यांच्या दर्शनाशी संलग्न  श्री अमरनाथ यात्रा आपल्या आध्यात्मिक परंपरेचा आणि सांस्कृतिक एकतेचा एक शाश्वत अध्याय आहे. शिवभक्तांची ही यात्रा सर्वार्थाने सुरक्षित आणि मंगलमय होवो, हीच माझी कामना! या पवित्र प्रसंगी भाविकांसाठी पाच संकल्प सांगितलेले माझे हे पत्र..."

***

सुषमा काणे/वैभवी जोशी /परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2280760) आगंतुक पटल : 21
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Bengali-TR , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Malayalam