संरक्षण मंत्रालय
आयएनएस इक्षक सेशेल्समधील पोर्ट व्हिक्टोरिया येथे दाखल
Posted On:
27 JUN 2026 5:07PM by PIB Mumbai
भारतीय नौदलाची स्वदेशी तंत्रज्ञानाद्वारे निर्मित मोठी सर्वेक्षण नौका आयएनएस इक्षक 26 जून 2026 रोजी दक्षिण-पश्चिम हिंदी महासागर क्षेत्रातील आपल्या कार्यात्मक तैनातीचा भाग म्हणून सेशेल्समधील पोर्ट व्हिक्टोरिया येथे दाखल झाली. सेशेल्सच्या 50 व्या राष्ट्रीय दिनाच्या उत्सवाच्या अनुषंगाने हा दौरा होत असून, भारत आणि सेशेल्स यांच्यातील दृढ सागरी भागीदारी आणि दीर्घकालीन मैत्रीचे हे प्रतीक आहे.
या बंदर भेटीदरम्यान आयएनएस इक्षक सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या उत्सवात सहभागी होणार असून, सागरी सहकार्य आणि परस्पर कार्यक्षमतेला अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने सेशेल्स संरक्षण दलासोबत यानिमित्त विविध व्यावसायिक संवाद साधला जाणार आहे. तसेच, ही नौका वैद्यकीय शिबिरे आयोजित करणे आणि अत्यावश्यक वस्तूंचे वितरण करणे अशा समाजाभिमुख उपक्रमांमध्ये सहभागी होणार असून, यामुळे दोन्ही देशांतील सद्भावना आणि जनतेतील परस्पर संबंध अधिक दृढ होतील.
या भेटीचा एक भाग म्हणून आयएनएस इक्षक नागरिकांसाठी खुली ठेवण्यात येणार आहे. याद्वारे भारतीय नौदलाच्या क्षमता तसेच प्रादेशिक सागरी सुरक्षा, सुरक्षितता आणि सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयीची त्याची बांधिलकी अनुभवण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.
आयएनएस इक्षकची ही तैनाती, मैत्रीपूर्ण देशांसोबत सागरी भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी तसेच `महासागर` या संकल्पनेनुसार हिंदी महासागर क्षेत्रात शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य वृद्धिंगत करण्यासाठी भारताची असलेली कटिबद्धता पुन्हा अधोरेखित करते.
(4)181B.jpeg)
(4)59WN.jpeg)
(3)MS3W.jpeg)
***
शैलेश पाटील/नितीन गायकवाड/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2278485)
अभ्यागत कक्ष : 43
|

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2278485)
|
|