संसदीय कामकाज मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते केंद्रीय विद्यालयांसाठीच्या 36 व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेच्या (2025–26) पारितोषिकांचे वितरण


लोकशाहीची मूल्ये, राष्ट्रीय सलोखा अंगीकारण्याचे केंद्रीय मंत्र्यांचे तरुणांना आवाहन

प्रविष्टि तिथि: 25 JUN 2026 9:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जून 2026

केंद्रीय विद्यालयांसाठीच्या 36 व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेचा (2025–26) पारितोषिक वितरण समारंभ आज नवी दिल्ली येथील संसद भवन संकुलातील संसद ग्रंथालय इमारतीमधील जीएमसी बालयोगी सभागृहात पार पडला.

कायदा आणि न्याय मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि संसदीय कामकाज मंत्रालयाचे राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल या समारंभाच्या अध्यक्षपदी होते. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना व केंद्रीय विद्यालयांना त्यांनी पारितोषिके प्रदान केली.

संसदीय कार्यपद्धतींचे उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि ते केवळ देशाचे भविष्यच नाहीत, तर भावी नेतेही आहेत, असे मेघवाल यांनी नमूद केले. हे विद्यार्थी राष्ट्राच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि त्यांच्या पुढील कारकीर्दीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

तसेच, त्यांनी उपस्थित सर्वांना 'LiFE' अर्थात पर्यावरण पूरक  जीवनशैलीची शपथ दिली आणि पर्यावरण रक्षणासाठी आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करण्यास प्रेरित केले.

केंद्रीय विद्यालयांसाठी आयोजित 36 व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत (2025–26) राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय विद्यालय, राष्ट्रपती भवन परिसर, नवी दिल्ली यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी युवा संसदचे पुन्हा सादरीकरण केले; उपस्थित मान्यवरांनी आणि उपस्थितांनी या सादरीकरणाचे कौतुक केले.

यंदा ही स्पर्धा 25 क्षेत्रांमधील 200 केंद्रीय विद्यालयांमध्ये आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये विजेत्यांनी विभागीय आणि राष्ट्रीय स्तरावर सहभाग घेतला.

या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल सरदार वल्लभभाई पटेल फिरती ढाल आणि राष्ट्रीय चषक डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय विद्यालय, प्रेसिडेंट इस्टेट, नवी दिल्ली (दिल्ली क्षेत्र, उत्तर विभाग) यांना प्रदान करण्यात आला. याव्यतिरिक्त, चार केंद्रीय विद्यालयांना विभागीय विजेतेपदाचे चषक प्रदान करण्यात आले. तसेच, विविध क्षेत्रांमधील 20 केंद्रीय विद्यालयांना क्षेत्रीय विजेतेपदाचे चषक प्रदान करण्यात आले. यामध्ये  मुंबई क्षेत्रामध्ये  पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्र. 1, एअर फोर्स स्टेशन, पुणे चा समावेश आहे.  

निलीमा चितळे/पर्णिका हेदवकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2278047) आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Tamil , English , Urdu , हिन्दी