खाण मंत्रालय
भारताच्या महत्त्वपूर्ण खनिज मोहिमेला गती: 56 महत्त्वपूर्ण खनिज क्षेत्र आणि 11 समन्वेषण परवाना क्षेत्रांचा यशस्वी लिलाव
प्रविष्टि तिथि:
23 JUN 2026 7:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जून 2026
खाण मंत्रालयाने महत्त्वपूर्ण तसेच धोरणात्मक खनिज क्षेत्रांच्या लिलावाचे अलीकडील टप्पे यशस्वीपणे पूर्ण करून, भारताची महत्त्वाच्या खनिजांबाबतची सुरक्षा आणि समन्वेषण परिसंस्था मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण टप्पे गाठले आहेत. या यशस्वी लिलावांमुळे, लिलाव झालेल्या महत्त्वाच्या आणि धोरणात्मक खनिज क्षेत्रांची एकूण संख्या 56 वर पोहोचली आहे. देशांतर्गत खनिज पुरवठा साखळी बळकट करण्याच्या आणि भारताच्या महत्त्वपूर्ण खनिज मोहिमेला पुढे नेण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
केंद्र सरकारने हाती घेतलेल्या सातव्या टप्प्यांतर्गत खाण मंत्रालयाने 10 महत्त्वाच्या आणि धोरणात्मक खनिज क्षेत्रांचा यशस्वी लिलाव केला. त्यामुळे अशा लिलाव झालेल्या क्षेत्रांची एकूण संख्या 56 झाली आहे. केंद्र सरकारने लिलावासाठी घेतलेल्या 88 विशिष्ट खनिज क्षेत्रांपैकी 56 क्षेत्रांचा लिलाव झाल्यामुळे, हा 63% पेक्षा जास्त यशस्वी लिलाव दर दिसून येत आहे.
महत्त्वपूर्ण खनिजे आणि समन्वेषण परवाना यांच्या लिलावातील हे सातत्यपूर्ण यश, देशाच्या खनिज क्षेत्र उद्योगाशी संबंधित भागधारकांचा वाढता विश्वास दर्शवते. तसेच, पद्धतशीर समन्वेषणाला चालना देण्यासाठी, गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि देशांतर्गत खनिज पुरवठा साखळी बळकट करण्यासाठी सरकारने केलेल्या धोरणात्मक सुधारणांचा प्रभावही यातून अधोरेखित होतो.
या उपक्रमांमुळे स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक गतिशीलता, अक्षय ऊर्जा प्रणाली, प्रगत वस्तुनिर्माण, इलेक्ट्रॉनिक्स, संरक्षण उपयोजने आणि अर्थव्यवस्थेतील इतर धोरणात्मक क्षेत्रांसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वपूर्ण खनिजांचे समन्वेषण आणि विकास याला गती मिळणार आहे.
* * *
सोनाली काकडे/संदेश नाईक/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2277200)
आगंतुक पटल : 11