पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी रिपब्लिक शिखर संमेलन 2026 मध्ये केलेल्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे केले अधोरेखित

प्रविष्टि तिथि: 22 JUN 2026 10:51PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिपब्लिक शिखर संमेलन 2026 मध्ये केलेल्या त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले आहेत.

‘एक्स’ वर सामायिक केलेल्या संदेशांच्या शृंखलेत मोदी लिहितात;

“ज्या नक्षलग्रस्त भागात जायला लोक दिवसा देखील घाबरत असत, तिथे आम्ही राष्ट्र प्रथम भावनेसह विकासाचा निश्चय करून आगेकूच करत आहोत. परिणामी, आज देशात माओवादी दहशतवाद शेवटच्या घटका मोजत आहे.

#RepublicSummit2026”

“सेवाभावाच्या गेल्या 12 वर्षांच्या कालावधीने आम्हाला आणखी एक यश मिळवून दिले आहे – निराशेच्या गर्तेतून बाहेर पडून आशा-आकांक्षांनी भरलेल्या भारताची उभारणी!

#RepublicSummit2026”

“मध्यमवर्गाला आम्ही नेहमीच खूप प्राधान्य दिले आहे. या वर्गाचे जीवनमान सुलभ होण्यासाठी सरकारने प्रत्येक पातळीवर काम केले आहे.

#RepublicSummit2026”

“म्हणूनच भारताच्या विकासाच्या या महत्त्वाच्या काळात वरकरणी पटतील असे पण खरेतर फोल असलेले युक्तिवाद करणाऱ्यांपासून सावध राहणे खूप गरजेचे आहे...

#RepublicSummit2026”

***

NitinFulluke / SanjanaChitnis / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2276926) आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Kannada