पंतप्रधान कार्यालय
लखनौ येथील आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
पंतप्रधानांनी केली मदत जाहीर
Posted On:
22 JUN 2026 8:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जून 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील लखनौ येथे झालेल्या आगीच्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
पंतप्रधानांनी शोकाकुल कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या असून जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे अशी प्रार्थना केली. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून पीडितांना प्रशासन सर्वतोपरी मदत करत आहे, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (पीएमएनआरएफ) प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे, अशी घोषणा पंतप्रधानांनी केली.
पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले;
“उत्तर प्रदेशातील लखनौ येथे आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे व्यथित झालो आहे. शोकाकुल कुटुंबियांप्रति माझ्या संवेदना. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत. बचावकार्य सुरू असून, प्रशासन सर्वतोपरी मदत करत आहे.
प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना पीएमएनआरएफकडून 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत म्हणून दिले जातील: पंतप्रधान @narendramodi"
* * *
निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2276853)
अभ्यागत कक्ष : 38
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam