दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

1 जानेवारी 2026 ते 31 मार्च 2026 या तिमाहीसाठीचा भारतीय दूरसंचार सेवा कामगिरी निदर्शक अहवाल

प्रविष्टि तिथि: 22 JUN 2026 8:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 जून 2026

 

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) 31 मार्च 2026 रोजी संपलेल्या तिमाहीसाठीचा भारतीय दूरसंचार सेवा कामगिरी निदर्शक अहवाल आज प्रसिद्ध केला. या अहवालातून  देशातील दूरसंचार सेवांचा व्यापक दृष्टिकोन मांडला आहे. हा अहवाल प्रामुख्याने सेवा पुरवठादारांनी सादर केलेल्या माहितीच्या आधारे तयार केला गेला आहे. या अहवालात 1 जानेवारी 2026 ते 31 मार्च 2026 या कालावधीतील देशातील दूरसंचार सेवांसह केबल टीव्ही, डीटीएच आणि रेडिओ प्रसारण सेवांचे मुख्य निकष आणि वाढीचे कल मांडण्यात आले आहेत.

या अहवालाचा कार्यकारी सारांश सोबत जोडला आहे. संपूर्ण अहवाल भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या www.trai.gov.in या संकेतस्थळावर आणि http://www.trai.gov.in/release-publication/reports/performance-indicators-reports या दुव्यावर उपलब्ध आहे. या अहवासांबंधी कोणतीही सूचना किंवा स्पष्टीकरण हवे असल्यास भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे सल्लागार (F&EA) विजय कुमार यांच्याशी +91-20907773 या दूरध्वनी क्रमांकावर तसेच fea1-div@trai.gov.in या ईमेलवर संपर्क साधता येऊ शकतो.

भारतीय दूरसंचार सेवा कामगिरी निदर्शके

जानेवारी – मार्च, 2026

कार्यकारी सारांश

देशातील एकूण इंटरनेट ग्राहकांची संख्या डिसेंबर 2025 च्या अखेरीस 1028.61 दशलक्ष इतकी होती, यात मार्च 2026 च्या अखेरीस वाढ होऊन ही संख्या 1092.79 दशलक्ष इतकी झाली आहे. याअंतर्गत 6.24% इतका त्रैमासिक वाढीचा दर नोंदवला गेला आहे. या एकूण 1092.79 दशलक्ष इंटरनेट ग्राहकांपैकी वायरलाइन इंटरनेट ग्राहकांची संख्या 46.54 दशलक्ष असून, वायरलेस इंटरनेट ग्राहकांची संख्या 1046.26 दशलक्ष इतकी आहे.

इंटरनेट नोंदणीचे स्वरुप

एकूण इंटरनेट ग्राहक संख्येमध्ये ब्रॉडबँड इंटरनेट ग्राहकांचा वाटा 1065.88 दशलक्ष तर नॅरोबँड इंटरनेट ग्राहकांचा वाटा 26.91 दशलक्ष इतका आहे.

डिसेंबर 2025 च्या अखेरीस ब्रॉडबँड इंटरनेट ग्राहकांची संख्या 1007.35 दशलक्ष इतकी होती, यात मार्च 2026 च्या अखेरीस 5.81% ने वाढ झाली आणि ही संख्या 1065.88 दशलक्ष इतकी झाली आहे. यासोबतच डिसेंबर 2025 च्या अखेरीस नॅरोबँड इंटरनेट ग्राहकांची संख्या देखील 21.25 दशलक्ष इतकी होती, यातही मार्च 2026 च्या अखेरीस 26.62% ने वाढ होऊन ही संख्या 26.91 दशलक्षावर पोहोचली आहे.

Service-wise composition of Adjusted Gross Revenue

डिसेंबर 2025 च्या अखेरीस वायरलाइन ग्राहकांची संख्या 47.37 दशलक्ष होती, तर मार्च 2026 च्या अखेरीस त्यात वाढ होऊन ती 48.25 दशलक्ष झाली असून, यात 1.86% इतका त्रैमासिक वाढीचा दर नोंदवला गेला आहे.

देशातील एकूण दूरध्वनी ग्राहकांची संख्या डिसेंबर 2025 च्या अखेरीस 1,306.14 दशलक्ष इतकी होती, ती मार्च 2026 च्या अखेरीस वाढून 1,330.58 दशलक्ष झाली आहे. मागील तिमाहीच्या तुलनेत यात 1.87% इतका वाढीचा दर नोंदवला गेला आहे.

दूरध्वनी ग्राहकांच्या नोंदणीचा कल आणि देशातील दूरसंचार सेवा घनता

शहरी भागातील दूरध्वनी ग्राहकांची संख्या डिसेंबर 2025 च्या अखेरीस 762.44 दशलक्ष इतकी होती, त्यात मार्च 2026 च्या अखेरीस वाढ होऊन ती 778.79 दशलक्ष इतकी झाली आहे. याच कालावधीत शहरी भागातील दूरसंचार सेवा घनता देखील 148.92% वरून वाढून 151.47% इतकी झाली आहे.

ग्रामीण भागातील दूरध्वनी ग्राहक संख्या डिसेंबर 2025 च्या अखेरीस 543.70 दशलक्ष इतकी होती, त्यात वाढ होऊन मार्च 2026 च्या अखेरीस ही संख्या 551.79 दशलक्ष इतकी झाली आहे. याच कालावधीत ग्रामीण भागातील दूरसंचार सेवा घनता देखील 59.63% वरून वाढून 60.46% झाली आहे.

एकूण ग्राहकांपैकी, ग्रामीण भागातील ग्राहकांचा वाटा डिसेंबर-25 च्या अखेरीस असलेल्या 41.63% वरून मार्च-26 च्या अखेरीस 41.47% पर्यंत कमी झाला.

या तिमाहीत 23.56 दशलक्ष ग्राहकांची निव्वळ भर पडल्यामुळे, एकूण वायरलेस (मोबाईल + एफडब्लूए) ग्राहकसंख्या डिसेंबर-25 च्या अखेरीस असलेल्या 1258.77 दशलक्षवरून मार्च-26 च्या अखेरीस 1282.33 दशलक्षपर्यंत वाढली; यामुळे मागील तिमाहीच्या तुलनेत 1.87% वाढीचा दर नोंदवला गेला. वार्षिक आधारावर  वर्षभरात वायरलेस  सबस्क्रिप्शनमध्ये 10.19% दराने वाढ झाली.

Composition of Telephone Subscribers

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एकूण 917 खाजगी सॅटेलाइट उपग्रह दूरचित्रवाहिन्यांना केवळ अपलिंकिंग किंवा, केवळ डाऊनलिंकिंग किंवा अपलिंकिंग आणि डाऊनलिंकिंग या दोन्हीसाठी परवानगी दिली आहे.

3 मार्च 2017 च्या (आणि त्यानंतर सुधारणा केलेल्या) टॅरिफ ऑर्डरनुसार प्रसारकांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात डाऊनलिंकिंगसाठी उपलब्ध असलेल्या 908 परवानाप्राप्त सॅटेलाइट टीव्ही चॅनेल्सपैकी, 31 मार्च 2026 रोजी 342 सॅटेलाइट पे टीव्ही (सशुल्क टीव्ही) चॅनेल्स अस्तित्वात होती.

मार्च 2026 रोजी संपलेल्या तिमाहीत, देशात 4 सशुल्क डीटीएच सेवा प्रदाते कार्यरत होते.

सार्वजनिक प्रसारक असलेल्या ऑल इंडिया रेडिओ, आकाशवाणी द्वारे चालवल्या जाणाऱ्या रेडिओ वाहिन्यांशिवाय एफएम  रेडिओ ऑपरेटर्सनी ट्राय  ला दिलेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबर 2025 रोजी 113 शहरांमध्ये 31 खाजगी एफएम रेडिओ ऑपरेटर्सद्वारे 385 खाजगी एफएम रेडिओ चॅनेल्स चालवली जात होती.

31 मार्च 2026 रोजी संपलेल्या तिमाहीत, 390 खाजगी एफएम  रेडिओ वाहिन्यांच्या संदर्भात एफएम रेडिओ ऑपरेटरनी नोंदवलेले जाहिरात उत्पन्न 414.03 कोटी रुपये इतके आहे; याउलट, त्याआधीच्या तिमाहीत (म्हणजेच 31 डिसेंबर 2025 रोजी) 385 खाजगी एफएम रेडिओ वाहिन्यांच्या संदर्भात हे उत्पन्न 419.29 कोटी रुपये होते.

31 मार्च 2026 पर्यंत, 564 कम्युनिटी रेडिओ स्टेशन्स कार्यरत आहेत.

 

* * *

सुषमा काणे/तुषार पवार/राजेश शिरभाते/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2276842) आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Tamil , Urdu , Kannada