सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 च्या कार्यक्रमांमध्ये 'निरोगी वृद्धत्वासाठी योग' ही संकल्पना केंद्रस्थानी
सक्रीय आणि सन्मानपूर्ण वृद्धत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी 1,300 ज्येष्ठ नागरिकांचा योग सत्रांमध्ये सहभाग
Posted On:
22 JUN 2026 4:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जून 2026
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने निरोगी वृद्धत्वासाठी योग या संकल्पनेवर आधारित विशेष कार्यक्रमांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 साजरा केला. केंद्रीय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी सांगितले की, योग धर्म, जात आणि पंथ यांच्या पलीकडे जाऊन लोकांना एकत्र आणतो आणि त्याच वेळी सर्वांगीण आरोग्य व कल्याणाला चालना देतो.
भारत मंडपम येथे आयोजित योग दिनाच्या एका कार्यक्रमात दिल्ली-एनसीआर परिसरातील सुमारे 1,300 ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. या कार्यक्रमात वृद्ध व्यक्तींची शारीरिक तंदुरुस्ती, भावनिक स्वास्थ्य, मानसिक कणखरपणा आणि जीवनशैलीचा दर्जा सुधारण्यामध्ये योगाची भूमिका अधोरेखित करण्यात आली.



यावेळी बोलताना सहसचिव मोनाली पी. धाकटे यांनी , निरोगी वृद्धत्वामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक आरोग्याचा समावेश होतो आणि सक्रीय व सन्मानपूर्ण वृद्धत्वासाठी योग हे एक महत्त्वाचे साधन ठरते असे सांगितले. संपूर्ण भारतातील ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य, सहभाग आणि कल्याण यांना आधार देणारी एक सर्वसमावेशक आणि वृद्ध-स्नेही परिसंस्था निर्माण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा मंत्रालयाने पुनरुच्चार केला.
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य, प्रतिष्ठा आणि सक्रीय सहभाग यांना चालना देणारी सर्वसमावेशक आणि वृद्ध-स्नेही परिसंस्था निर्माण करण्याच्या आपल्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला. आंतरराष्ट्रीय योग दिन आणि सुरू असलेले कल्याणकारी कार्यक्रम यासारख्या उपक्रमांद्वारे, मंत्रालय देशभरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी निरोगी वृद्धत्व, सामाजिक समावेशकता आणि जीवनशैली सुधारण्यास सातत्याने प्रोत्साहन देत आहे.
* * *
निलिमा चितळे/राजेश शिरभाते/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2276696)
अभ्यागत कक्ष : 62