पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

विकसित भारत 2047 च्या उभारणीत युवांच्या भूमिकेवर पंतप्रधानांनी एक लेख केला सामायिक

Posted On: 18 JUN 2026 7:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जून 2026

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री  मनसुख मांडविया यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला आहे.

गेल्या 12 वर्षांतील भारताच्या परिवर्तनाची कहाणी, ही इथल्या तरुणाईचीही कहाणी आहे, असे या लेखात अधोरेखित केले आहे. दूरदर्शी दृष्टिकोनातून  मार्गदर्शन, कौशल्यविकास, नवोन्मेष आणि उद्योजकतेमधील अभूतपूर्व गुंतवणुकीच्या पाठबळावर, या अमृत पिढीला त्यांच्या आकांक्षा साकार करण्यासाठी आणि राष्ट्रउभारणीत योगदान देण्यासाठी संधी निर्माण केल्या जात आहेत, असे त्यांनी यातनमूद केले आहे.  हा लेख पुढे विकसित भारत 2047 च्या उभारणीतील युवा भारताच्या भूमिकेवर सविस्तर भाष्य करतो.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स पोस्टमध्ये म्हटले  आहे;

“गेल्या 12 वर्षांतील भारताच्या परिवर्तनाची कहाणी ही येथील तरुणाईचीही कहाणी आहे. आमच्या दूरदर्शी मार्गदर्शनाखाली, कौशल्यविकास, नवोपक्रम आणि उद्योजकतेमधील अभूतपूर्व गुंतवणुकीद्वारे, आम्ही अमृत पिढीसाठी  त्यांच्या आकांक्षा साकार करण्याची आणि राष्ट्रउभारणीत योगदान देण्याची संधी निर्माण करत आहोत.

केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी 'विकसित भारत 2047 घडवण्यातील युवा भारताच्या भूमिकेवर लिहिलेला एक अंतर्दृष्टीपूर्ण लेख!"


सोनाली काकडे/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2274841) अभ्यागत कक्ष : 31