19 वे मिफ्फ 2026 : वेव्ह्ज डॉक बाजार सोहळ्याची क्षणचित्रे
मुंबई, 18 जून 2026
19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज चित्रपट निर्मात्यांसाठी एक महत्वाचा समारंभ होता. दुसऱ्या वेव्ह्ज बाजारचा समारोप आणि बहुप्रतीक्षित पुरस्कार समारंभ, आज या महोत्सवात झाला. माहितीपट आणि लघुपटांसारख्या नॉन फिक्शन स्वरूपातील चित्रपटांना आवश्यक ती गती आणि पाठबळ देण्यासाठी चालवण्यात येत असलेल्या या उपक्रमांतर्गत उल्लेखनीय चित्रपट प्रकल्पांना पोस्ट-प्रॉडक्शनसाठी प्रोत्साहनपर साहाय्य, चित्रपटगृहांमधील वितरणासाठी पाठबळ तसेच रोख अनुदान प्रदान करण्यात आले.
प्रसाद लॅब्स, भारतीय सर्जक तंत्रज्ञान संस्था- आयआयसीटी, रिबॉर्न इंडिया फिल्म्स आणि एनएफडीसी यांसारख्या आघाडीच्या संस्थांकडून दिले जाणारे हे पुरस्कार भारतभरातील सक्षम, स्वतंत्र आणि आशयसमृद्ध कथाकथन कलेला नवी दिशा देत आहेत.
18 जून रोजी जे. बी हॉल इथे आयोजित करण्यात आलेल्या यंदाच्या वेव्ह्ज डॉक बाजार पुरस्कार सोहळ्याची ही काही क्षणचित्रे !
प्रसाद लॅब्स पुरस्कार

19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत आयोजित दुसऱ्या वेव्ह्ज डॉक बाजार च्या सांगता समारंभात, 18 जून 2026 रोजी जे बी हॉल इथे, प्रसाद लॅब्सचे, महाव्यवस्थापक नितीन पिंगळे यांनी माहितीपट निर्मात्या करिश्मा राव यांना त्यांच्या ऑन ए गुड नोट या माहितीपटासाठी प्रसाद लॅब्स पोस्ट-प्रॉडक्शन पुरस्कार प्रदान केला. या पुरस्कारांतर्गत प्रसाद लॅब्स, चेन्नई इथे 50 तासांपर्यंत मोफत 4K डिजिटल इंटरमिजिएट (DI) सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यामुळे चित्रपटाच्या पोस्ट-प्रॉडक्शन प्रक्रियेला महत्त्वपूर्ण तांत्रिक सहाय्य मिळणार आहे.

या सोहळ्यात, प्रसाद लॅब्सचे, महाव्यवस्थापक नितीन पिंगळे यांनी चित्रपट निर्माते, इंद्रजित मोरे यांना त्यांचा लघुपट, ‘इट टेक्स अ व्हिलेज’ साठी, प्रसाद लॅब्स पोस्ट-प्रॉडक्शन पुरस्कार प्रदान केला. या पुरस्काराअंतर्गत, 50 तासांच्या डीआय सेवांसाठी, 50 टक्के सवलत दिली जाणार आहे.
आयआयसीटी पोस्ट प्रॉडक्शन पुरस्कार

19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत आयोजित दुसऱ्या वेव्ह्ज डॉक बाजार च्या सांगता समारंभात, 18 जून 2026 रोजी जे बी हॉल इथे आयआयसीटी चे संचालक सतीश नारायणन यांनी, यांनी माहितीपट निर्माते नंदन सक्सेना अणि कविता बहल यांना त्यांच्या अॅडयू दिल्ली या माहितीपटासाठी आयआयसीटी पोस्ट-प्रॉडक्शन पुरस्कार प्रदान केला. या पुरस्कारांतर्गत 50 तासांच्या 4K डिजिटल इंटरमिजिएट (DI) सेवांवर 50 टक्के सवलत देण्यात आली असून, त्यामुळे चित्रपटाच्या पोस्ट-प्रॉडक्शन प्रक्रियेसाठी महत्त्वपूर्ण तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध होणार आहे.

19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत आयोजित दुसऱ्या वेव्ह्ज डॉक बाजार च्या सांगता समारंभात, 18 जून 2026 रोजी जे बी हॉल इथे आयआयसीटी चे संचालक सतीश नारायणन यांनी, यांनी माहितीपट निर्मात्या सान्या आनंद यांना त्यांचा माहितीपट ‘दो चार दिन’ साठी आयआयसीटी पोस्ट-प्रॉडक्शन पुरस्कार प्रदान केला. या पुरस्कारांतर्गत 50 तासांच्या 4K डिजिटल इंटरमिजिएट (DI) सेवांवर 50 टक्के सवलत देण्यात आली असून, त्यामुळे चित्रपटाच्या पोस्ट-प्रॉडक्शन प्रक्रियेसाठी महत्त्वपूर्ण तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध होणार आहे.
रिबॉर्न इंडिया चित्रपट वितरण पुरस्कार

18 जून 2026 रोजी जेबी हॉल येथे आयोजित 19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (मिफ्फ 2026) दुसर्या 'वेव्हज डॉक बझारमध्ये, 'रिबॉर्न इंडिया फिल्म्स'चे राहुल अग्रवाल आणि रोहित अग्रवाल यांनी चित्रपट निर्माती करिश्मा राव यांना त्यांच्या 'ऑन अ गुड नोट' या माहितीपटासाठी 'रिबॉर्न इंडिया फिल्म डिस्ट्रिब्युशन अवॉर्ड' प्रदान (7 लाख रुपये मूल्याच्या वितरण सहकार्यासह 10 स्क्रीन्सवर चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी सहाय्य) केला .
एनएफडीसी रोख अनुदान पुरस्कार

18 जून 2026 रोजी जेबी हॉल येथे आयोजित 19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (मिफ्फ 2026) दुसर्या 'वेव्हज डॉक बझारमध्ये, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे (एनएफडीसी) व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी 'कुंचोक अँड हिज मेनी मून्स' या चित्रपटासाठी चित्रपट निर्माते अशोक मीना यांना एनएफडीसीचे 1 लाख रुपयांचे रोख अनुदान प्रदान केले.

18 जून 2026 रोजी जेबी हॉल येथे आयोजित 19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (मिफ्फ 2026) दुसर्या 'वेव्हज डॉक बझार मध्ये, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे (एनएफडीसी) व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी 'द गर्ल बिनिथ द सन' या चित्रपटासाठी चित्रपट निर्मात्या मधुरिमा मैती यांना एनएफडीसीचे 1 लाख रुपयांचे रोख अनुदान प्रदान केले.

18 जून 2026 रोजी जेबी हॉल येथे आयोजित 19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (मिफ्फ 2026) दुसर्या 'वेव्हज डॉक बझार मध्ये, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे (एनएफडीसी) व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी 'तुकडो तुकडो पृथ्वी' या चित्रपटासाठी चित्रपट निर्मात्या अस्मिता पाल यांना एनएफडीसीचे 1 लाख रुपयांचे रोख अनुदान प्रदान केले.

18 जून 2026 रोजी जेबी हॉल येथे आयोजित 19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (मिफ्फ 2026) दुसर्या 'वेव्हज डॉक बझार मध्ये, पुरस्कार विजेत्या चित्रपट निर्मात्यांबरोबर प्रकाश मगदूम (व्यवस्थापकीय संचालक, एनएफडीसी), नितीन पिंगळे (गम, प्रसाद लॅब्स), सतीश नारायणन (आयआयसीटी), राहुल आणि रोहित अग्रवाल (रिबॉर्न इंडिया फिल्म्स) यांच्यासह इतर मान्यवर.
* * *
पीआयबी मुंबई | सोनाली काकडे/राधिका अघोर/राजश्री आगाशे/दर्शना राणे
रिलीज़ आईडी:
2274821
| Visitor Counter:
28