सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय 17-18 जून 2026 रोजी "स्टॅटॅथॉन-ए डेटा जर्नी फॉर विकसित भारत", या राष्ट्रीय स्तरावरील हॅकाथॉनच्या 36 तासांच्या अंतिम फेरीचे आयोजन करणार
प्रविष्टि तिथि:
16 JUN 2026 8:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जून 2026
उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा अवलंब करून आणि शैक्षणिक संस्था, उद्योग आणि स्टार्ट-अप्स यांच्याशी सहयोग साधून, राष्ट्रीय सांख्यिकीय परिसंस्थेचे आधुनिकीकरण करणे, हे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या प्राधान्य क्षेत्रांपैकी एक आहे. एक मजबूत आणि भविष्यासाठी सज्ज सांख्यिकी प्रणाली तयार करण्यासाठी वचनबद्ध असलेली संस्था म्हणून, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय मोठ्या प्रमाणावर बुद्धिमान विश्लेषण मिळवण्यासाठी, कृत्रिम बुद्धिमत्तेसह इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवोन्मेष परिसंस्थेला चालना देत आहे.
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेलच्या सहकार्याने, "स्टॅटॅथॉन- ए डेटा जर्नी फॉर विकसित भारत" या राष्ट्रीय स्तरावरील हॅकेथॉनचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचा 36 तासांचा ग्रँड फिनाले (अंतिम फेरी) 17-18 जून 2026 रोजी फरिदाबाद येथील 'मानव रचना इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड स्टडीज' च्या आवारात आयोजित करण्यात येणार आहे. एनएसओ, इंडियाने आयोजित केलेल्या हॅकेथॉनच्या मालिकेतील ही तिसरी स्पर्धा आहे.
या हॅकाथॉनने देशभरातील विद्यार्थी आणि स्टार्ट-अप्समध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला असून, यात आघाडीच्या शैक्षणिक संस्था आणि उदयोन्मुख उद्योगांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नवोन्मेषकांकडून 5,000 हून अधिक प्रवेशिका प्राप्त झाल्या.
सरकार आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांकडून कठोर मूल्यमापन प्रक्रियेच्या आधारे, 36 तासांच्या ग्रँड फिनालेमध्ये भाग घेण्यासाठी 25 संघांची अंतिम निवड करण्यात आली. अंतिम फेरीतील 25 संघांपैकी 21 संघ शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधित्व करतात, तर चार स्टार्ट-अप आहेत.
सहभागी संघ अंतिम फेरीत, एनएसओ तसेच शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रातील मार्गदर्शक आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नवोन्मेषी आणि प्रभावी उपाय विकसित करण्यासाठी भरीव काम करतील.
स्टॅटॅथॉनच्या माध्यमातून, 'विकसित भारत'च्या संकल्पनेला पाठिंबा देण्यासाठी नवोन्मेषाला चालना देणे, सरकार, शिक्षण संस्था आणि उद्योग यांच्यातील सहकार्य मजबूत करणे, तसेच भारताची अधिकृत सांख्यिकी प्रणाली अधिक मजबूत करण्यासाठी उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा उपयोग करणे, हे एनएसओचे उद्दिष्ट आहे.
सोनाली काकडे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2273734)
आगंतुक पटल : 15