केंद्रीय लोकसेवा आयोग
azadi ka amrit mahotsav

नागरी सेवा (पूर्व) परीक्षा, 2026 चा निकाल

प्रविष्टि तिथि: 16 JUN 2026 1:08PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 जून 2026

 

24/05/2026 रोजी घेण्यात आलेल्या नागरी सेवा (पूर्व) परीक्षा, 2026 च्या निकालाच्या आधारे, खालील अनुक्रमांक असलेले उमेदवार नागरी सेवा (मुख्य) परीक्षा, 2026 साठी पात्र ठरले आहेत.

या उमेदवारांची उमेदवारी तात्पुरत्या स्वरूपाची आहे. परीक्षेच्या नियमांनुसार, या सर्व पात्र उमेदवारांना खालील तपशील सादर करण्यासाठी अथवा अद्ययावत करण्यासाठी एक कालावधी (विंडो) उपलब्ध करून दिला जाईल:

  1. नागरी सेवा (मुख्य) परीक्षा, 2026 साठी 200 रुपये शुल्क भरणे (शुल्क माफीसाठी पात्र  म्हणजेच महिला/पीडब्ल्यूबीडी/एससी/एसटी उमेदवार वगळता).
  2. मुख्य परीक्षेसाठी लेखनिकाची माहिती, सहाय्यक साधन आणि मोठ्या अक्षरांमधील (फॉन्ट) प्रश्नपत्रिकेबाबतचे तपशील सादर करणे अथवा त्यात सुधारणा करणे.
  3. नागरी सेवा (मुख्य) परीक्षा, 2026 साठी संवर्ग पसंती भरणे.

हे तपशील भरण्यासाठी आणि सादर करण्यासाठीची विंडो आयोगाच्या संकेतस्थळावर 19 ते 28 जून 2026 दरम्यान उपलब्ध असेल.

हे लक्षात घ्यावे की, 04.02.2026 रोजी जारी करण्यात आलेल्या 'नागरी सेवा परीक्षा नियम, 2026’ मध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, नागरी सेवा (मुख्य) परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांनी या कालावधीत (विंडोमध्ये) पोर्टलवर (https://upsconline.nic.in) अनिवार्यपणे लॉग-इन करणे, तसेच त्यांचे तपशील अद्ययावत करणे आणि/किंवा त्यांची पुन्हा पुष्टी करणे आवश्यक आहे. आयोगाला 'ई-प्रवेशपत्र' (e-Admit Card) जारी करता यावे यासाठी त्यांनी अर्ज सादर करणे गरजेचे आहे, ते केले नाही, तर संबंधित उमेदवारांना परीक्षेच्या पुढील टप्प्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली जाणार नाही.

ज्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे किंवा माहिती यापूर्वीच अपलोड केली आहे आणि ज्यांना कोणतीही माहिती अद्ययावत अथवा भरायची नाही, अशा उमेदवारांनीही 'नागरी सेवा (मुख्य) परीक्षा, 2026' साठी 'ई-प्रवेशपत्र' (e-Admit Card) मिळवण्यासाठी लॉग-इन करणे आणि तपशील पडताळून पाहिल्यानंतर अंतिम सबमिशन (final submission) करणे आवश्यक आहे.

उमेदवारांना असेही सूचित करण्यात येते की, सीएस (पी) परीक्षा, 2026 चे गुण, कट-ऑफ गुण आणि उत्तरतालिका (Answer Keys) या आयोगाच्या https://upsc.gov.in या संकेतस्थळावर केवळ 'नागरी सेवा परीक्षा 2026' आणि 'भारतीय वन सेवा परीक्षा 2026' यांची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, म्हणजेच अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतरच उपलब्ध करून दिल्या जातील.

गेल्या वर्षी, नागरी सेवा परीक्षा 2025 साठी जाहीर करण्यात आलेल्या 1087 रिक्त जागांच्या तुलनेत, नागरी सेवा (मुख्य) परीक्षा 2025 साठी एकूण 14,161 उमेदवारांची निवड करण्यात आली होती. यावर्षी, नागरी सेवा परीक्षा, 2026 साठी अधिसूचित केलेल्या 1016 रिक्त पदांच्या तुलनेत नागरी सेवा (मुख्य) परीक्षा, 2026 साठी एकूण 13,343 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

उमेदवारांना सकाळी 09:00 ते रात्री 08:00 या वेळेत आयोगाच्या कॉल सेंटरच्या दूरध्वनी क्रमांक 011-40303444/24041001 वर वरील परीक्षेच्या संदर्भात त्यांच्या समस्यांबाबत (असल्यास) कोणतीही माहिती/स्पष्टीकरण मिळवता येईल.

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

* * *

नाना मेश्राम/राजश्री आगाशे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2273461) आगंतुक पटल : 27
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil