पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विवेकबुद्धी आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक
Posted On:
16 JUN 2026 10:50AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जून 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयम, विवेक आणि दूरदृष्टी यांच्या आधारावर केलेल्या कृतींमुळेच सुख-समृद्धीचे मार्ग खुले होतात, असे सांगितले. प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी त्याचा सखोल विचार आणि योग्य आकलन आवश्यक असून, यशाचा पाया नेहमीच विचारपूर्वक उचललेल्या पावलांवर उभा असतो, असे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले -
“सहसा विदधीत न क्रियामविवेकः परमापदां पदम्।
वृणते हि विमृश्यकारिणं गुणलुब्धाः स्वयमेव सम्पदः॥”
या सुभाषिताचा आशय असा आहे की, विचार न करता कोणतेही कार्य करू नये; कारण अविचाराने केलेले कार्य मोठ्या संकटाला कारणीभूत ठरू शकते. उलट, जो व्यक्ती विचारपूर्वक निर्णय घेतो, त्याच्याकडे यश आणि समृद्धी आपोआप आकर्षित होतात.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर लिहिले;
"धैर्य, विवेक आणि दूरदृष्टीने केलेल्या कार्यांमुळेच सुख-समृद्धीचे दरवाजे उघडतात. त्यामुळे प्रत्येक निर्णय पूर्ण समजूतदारपणे घेणे आवश्यक आहे, कारण विचारपूर्वक उचललेले पाऊल हेच यशाचा खरा पाया ठरते.”
सहसा विदधीत न क्रियामविवेकः परमापदां पदम्।
वृणते हि विमृश्यकारिणं गुणलुब्धाः स्वयमेव सम्पदः॥”
* * *
नाना मेश्राम/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2273353)
अभ्यागत कक्ष : 51
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam