संरक्षण मंत्रालय
आयएनएस तरकश ही भारतीय नौदलाची युद्धनौका सेशेल्समधील पोर्ट व्हिक्टोरिया येथे दाखल
प्रविष्टि तिथि:
13 JUN 2026 4:39PM by PIB Mumbai
आयएनएस तरकश ही भारतीय नौदलाची युद्धनौका 12 जून 2026 रोजी नैऋत्य हिंदी महासागर क्षेत्रात सुरू असलेल्या कार्यकारी तैनातीदरम्यान सेशेल्समधील पोर्ट व्हिक्टोरिया येथे दाखल झाली.
कोलकाता येथील मे. जीआरएसई मध्ये दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर, भारताकडून सेशेल्सला जाणाऱ्या सेशेल्स तटरक्षक दलाच्या पीएस झोरोस्टर या जहाजाला भारतीय जहाजाने साथ दिली. हा प्रवास बांधणी आणि देखभालीच्या पलीकडे असलेल्या दीर्घकालीन सागरी भागीदारीचे प्रतिबिंब आहे. या प्रवासातून हिंद महासागर क्षेत्रातील सामायिक सागरी आव्हानांना प्रभावीपणे तोंड देण्यासाठी लागणारी आंतर-क्षमता देखील अधोरेखित होते.
या भेटीदरम्यान, जहाजाचे कमांडिंग ऑफिसर कॅप्टन रोहित मिश्रा हे सेशेल्स सरकारमधील वरिष्ठ अधिकारी आणि सेशेल्स संरक्षण दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. या वास्तव्यात सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाणार आहे. तसेच, आवश्यक सुटे भाग आणि महत्त्वाच्या वस्तू सेशेल्स सरकारकडे सुपूर्द केल्या जातील. भारत आणि सेशेल्स यांच्यातील मैत्री, परस्पर सहकार्य आणि द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करणे हा या बंदरभेटीचा उद्देश आहे.
(1)4UAR.jpeg)
28U6.jpeg)
(1)HT2H.jpeg)
N25A.jpeg)
***
माधुरी पांगे/राज दळेकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2272519)
आगंतुक पटल : 17