रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून रेल्वे भर्ती मंडळाच्या भर्ती प्रक्रियेचा आढावा

प्रविष्टि तिथि: 12 JUN 2026 10:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जून 2026

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज भारतीय रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत रेल्वे भर्ती मंडळाच्या (रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड-आर आर बी) भर्ती प्रक्रियेबाबत एक उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अधिक पारदर्शक, अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीच्या  आवश्यकतेवर भर दिला.

भारतीय रेल्वेने सहा प्रमुख श्रेणींमधील 47,084 रिक्त पदांसाठीची भर्ती प्रक्रिया पूर्ण करत आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 43,781 उमेदवारांची भर्ती केली आहे. रेल्वेच्या भर्ती प्रक्रियेला मिळालेल्या गतीचे हे प्रतिबिंब आहे. भारतीय रेल्वे आपल्या कर्मचारीवर्गाची संख्या आणि क्षमता वाढवण्यासाठी सातत्याने आणि योग्य वेळी भर्ती प्रक्रिया राबवत आहे आणि यापुढेही तसे करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे.

Completed Recruitments

Posts

CEN No.

Vac notified

Vac notified

Empanelled (Recruited) till date

Assistant Loco Pilots (ALPs)

CEN 01/2024

18799

Dec'25

17193

Technicians

CEN 02/2024

14298

July'25

13416

Sub-Inspectors

CEN RPF 01/2024

452

Jan'26

450

Constables

CEN RPF 02/2024

4208

Mar'26

4205

Junior Engineer (JE)/DMS/CMA

CEN 03/2024

7951

Oct'25

7333

Paramedical categories

CEN 04/2024

1376

Oct'25

1184

रेल्वे मंत्र्यांनी सांगितले की, दरवर्षीचे भरती वेळापत्रक जाहीर करणे आणि रिक्त पदांची माहिती दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध करणे या उपक्रमांना उमेदवारांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे, असे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की, कॅलेंडरनुसार निश्चित वेळापत्रकावर आधारित भर्ती पद्धतीमुळे उमेदवारांना परीक्षेच्या तयारीचे नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करता येत आहे. तसेच भर्ती प्रक्रिया कधी आणि कशी होईल याबाबत अधिक स्पष्टता आणि निश्चितता निर्माण झाली आहे.

Exams Held & Results Declared

Name of Exam

CEN

No.

Vac notified

1st Stage CBT

Second Stage CBT/PET

3rd Stage CBAT/

TST/CBTST etc.

DV & ME (onwards)

Empanelments (onwards)

NTPC –

Graduate level

CEN

05/2024

8113

05.06.25

to 24.06.25

13.10.2025

28.12.2025

& 11.02.2026

May'26

onwards*

July'26

onwards

NTPC –

Under-Graduate

level

CEN

06/2024

3445

7.08.2025

to 09.09.2025

  (19 days; 57 shifts)

20.12.2025

13.02.2026

June'26*

Aug26

Ministerial &

  Isolated Categories

CEN

07/2024

1036

10.09.2025

to 13.09.2025

28.12.2025

NA

June'26**

July'26

Technicians

CEN

02/2025

6238

06.03.2026

to 13.03.2026

NA

NA

June'26

Aug26

Paramedical

 categories

CEN

03/2025

434

11.03.2026

 to 13.03.2026

NA

NA

June'26

Aug

वैष्णव यांनी विभागीय परीक्षा,  संगणक आधारित परीक्षा पद्धतीने घेण्याच्या प्रक्रियेतील प्रगतीचाही आढावा घेतला. भर्ती प्रक्रिया अधिक वेगवान, परिणामकारक आणि उमेदवारांसाठी सोयीस्कर व्हावी यासाठी, ज्या ठिकाणी शक्य असेल तेथे टॅबलेटच्या माध्यमातून परीक्षा घेण्याची पद्धत अधिक प्रमाणात अवलंबावी, यावर त्यांनी भर दिला.

परीक्षांमध्ये विविध भाषांमध्ये प्रश्नपत्रिका किंवा इतर सुविधा उपलब्ध करून देण्याच्या व्यवस्थेवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. देशातील विविध भाषा बोलणाऱ्या उमेदवारांना परीक्षेत समान संधी मिळावी आणि भाषेमुळे कुणालाही अडचण येऊ नये, यासाठी विविध शहरांमध्ये आणि अनेक सत्रांमध्ये अनेक भाषांमध्ये परीक्षा आयोजित केल्या जात आहेत.

Examinations with Final Selection Expected in Next 6 months to 1 year

Name of Exam

CEN No.

Vac

  notified

1st Stage CBT

Second Stage CBT/PET

  3rd Stage CBAT/

 TST/CBTST etc.

DV & ME (onwards)

 Empanelments (onwards)

Level-1

CEN

08/2024

32438

27.11.2025 to 10.02.2026

 

NA

 

 

Assistant Loco

Pilots (ALPs)

CEN 01/2025

10970

13.02.26 to

11.03.26

28.07.2026

(1,50,000)

*30th Oct'26

(90,000)

Nov'26

Dec'26

 Section Controller

CEN

04/2025

368

11.02.26 &

12.02.26

NA

06.06.2026

(3000)

Aug'26

Sep'26

Junior Engineer (JE)/DMS/CMA

CEN

05/2025

2585

19.02.26,

20.02.26 &

25.02.26

02.07.2026

(38860)

NA

Sep'26

Oct'26

NTPC –

Graduate level

CEN

06/2025

5810

16.03.26 to

27.03.26

10.07.2026

*30.09.2026

Dec'26

Jan'27

NTPC –

Under-Graduate

level

CEN

07/2025

3058

07.05.2026 to 09.05.2026 and 13.06.2026 to 20.06.2026

 (exam due

for 25 lakhs

candidates)

*17.09.2026

*04.12.2026

Mar'27

उमेदवार आणि भागधारकांशी  संवाद अधिक मजबूत करण्याचे, केंद्रीय मंत्र्यांनी रेल्वे भर्ती मंडळांना निर्देश दिले. उमेदवारांना अचूक माहिती मिळत रहावी आणि भर्ती प्रक्रियेवरील त्यांचा विश्वास कायम राहावा, यासाठी कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या माहितीचे तातडीने योग्य माहितीद्वारे खंडन केले पाहिजे, यावर त्यांनी विशेष भर दिला.

सुषमा काणे/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2272364) आगंतुक पटल : 7
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Kannada