वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कापड उद्योग क्षेत्रासाठीच्या उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत सरकारकडून 96 कंपन्यांना मंजुरी, उत्पादन आणि रोजगाराला चालना देण्यासाठी 12,822 कोटी रुपयांची गुंतवणूक

प्रविष्टि तिथि: 10 JUN 2026 7:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 जून 2026

 

उत्पादन संलग्न प्रोत्साहन (PLI) योजनेच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत केंद्र सरकारने कापड उद्योग क्षेत्रातील 22 नवीन अर्जदारांना मंजुरी दिली आहे. नव्याने मंजूर झालेल्या या कंपन्यांच्या माध्यमातून एकूण 2,339.14 कोटी रुपयांची गुंतवणूक येईल अशी अपेक्षा आहे. यासोबतच  अधिसूचित उत्पादनांमधून 15,561.34 कोटी रुपयांची अंदाजित उलाढाल होईल  आणि कापड उद्योग मूल्य साखळीअंतर्गत 36,217 इतक्या रोजगाराच्या संधी निर्माण होतील अशीही अपेक्षा आहे. या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत एकूण 96 कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीअंतर्गत हमीबद्ध गुंतवणूक 12,822.67 कोटी रुपये इतकी असून, 58,294.18 कोटी रुपयांची उलाढाल होईल असा अंदाज आहे.

मंजुरी दिले गेलेले अर्जदार हे उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेअंतर्ग समाविष्ट असलेल्या मानवनिर्मित फायबरचे कपडे, मानवनिर्मित फायबरचे कापड आणि विशिष्ट तांत्रिक उपयोगासाठीचे कापड (Technical Textiles) यांसारख्या प्रमुख केंद्रित क्षेत्रांशी संबंधित आहेत. यामुळे मूल्यवर्धित कापड उत्पादनाचे जागतिक केंद्र म्हणून भारताचे स्थान अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.

उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेअंतर्गत या कंपन्यांचा झालेला समावेश हा, कापड उद्योग क्षेत्रातील उदयोन्मुख विभागांमधील गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना उद्योग क्षेत्राकडून मिळत असलेला सातत्यपूर्ण प्रतिसादाची प्रचिती देणारा ठरला आहे. प्रस्तावित गुंतवणूक आणि उत्पादन क्षमता या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला अनुसरून  असलेली एक मजबूत आणि जागतिक पातळीवरील स्पर्धात्मक कापड परिसंस्था विकसित करण्याकरता पाठबळ देणारी ठरेल अशी अपेक्षा आहे.

 

* * *

शैलेश पाटील/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2271323) आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Gujarati , Tamil