पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी लोकसेवा ही सुशासनाची सर्वात मोठी कसोटी असल्याचे अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित शेयर केले
Posted On:
10 JUN 2026 1:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जून 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसेवा ही सुशासनाची सर्वात मोठी कसोटी असल्याचे अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे. नम्रता, समर्पण आणि कर्तव्याप्रति निष्ठेने सातत्याने काम करणारी व्यक्तीच लोकांचा विश्वास संपादन करते, असे पंतप्रधानांनी नमूद केले आहे.
पंतप्रधानांनी एक्स वर लिहिले आहे:
“लोकसेवा हीच सुशासनाची सर्वात मोठी कसोटी आहे. नम्रता, समर्पण आणि कर्तव्याप्रति निष्ठेने सातत्याने काम करणारी व्यक्तीच लोकांचा विश्वास संपादन करते.
सदानुरक्तप्रकृतिः प्रजापालनतत्परः।
विनीतात्मा हि नृपतिर्भूयसी श्रियमश्नुते॥"
जो लोकप्रतिनिधी जनसेवेला पवित्र कर्तव्य मानतो, लोकांच्या कल्याणासाठी अथक परिश्रम घेतो, सुशासनाच्या माध्यमातून त्यांची सुरक्षा आणि हित सुनिश्चित करतो आणि नम्रता, आत्मशिस्त व विकासाप्रति असलेल्या निष्ठेसह समाजाच्या प्रगतीसाठी समर्पित राहतो, तोच खऱ्या अर्थाने लोकांचा विश्वास, सन्मान, मान्यता आणि समृद्धी प्राप्त करतो.
* * *
नेहा कुलकर्णी/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2271042)
अभ्यागत कक्ष : 60
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam