पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधानांनी सामूहिक कृतीचे आवाहन करणारा लेख शेयर केला

Posted On: 05 JUN 2026 5:39PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 जून 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, पर्यावरणीय आव्हानांचा सामना करण्यासाठी सामूहिक कृती आणि लोकसहभागाचे आवाहन करणारा केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी लिहिलेला लेख शेयर (सामायिक) केला आहे.

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी या लेखात शाश्वत, किफायतशीर आणि दीर्घकालीन पर्यावरणीय लाभ देण्यासाठी सक्षम अशा निसर्ग-आधारित उपायांच्या माध्यमातून या आव्हानांवर मात करण्याचे आवाहन केल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

मोदी यांनी नमूद केले की, केंद्रीय मंत्र्यांनी या गोष्टीवर भर दिला आहे की, अधिक हरित दिल्ली हे विकास आणि पर्यावरणीय जबाबदारी, याचा समतोल साधण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचे  प्रतीक असेल.

पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले आहे:

“जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, केंद्रीय मंत्री @byadavbjp यांनी पर्यावरणाशी संबंधित आव्हानांचा सामना करण्यासाठी सामूहिक कृती आणि लोकसहभागाचे आवाहन केले आहे. यासाठी त्यांनी शाश्वत, किफायतशीर आणि दीर्घकालीन पर्यावरणीय लाभ देण्यासाठी सक्षम अशा निसर्ग-आधारित उपायांचा अवलंब करण्यावर भर दिला आहे.

हरित दिल्ली, हे पर्यावरणीय जबाबदारी आणि विकासाचा समतोल राखण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचे प्रतीक असेल, यावर त्यांनी भर दिला आहे.”

 

* * *

नेहा कुलकर्णी/राजश्री आगाशे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2269391) अभ्यागत कक्ष : 47