पंतप्रधान कार्यालय
उत्तर प्रदेशातील 'जय प्रकाश नारायण पक्षी अभयारण्य' हे भारताचे 100 वे रामसर स्थळ म्हणून घोषित झाल्याबद्दल पंतप्रधानांकडून प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
05 JUN 2026 5:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जून 2026
उत्तर प्रदेशातील बलिया येथील 'जय प्रकाश नारायण पक्षी अभयारण्य' (सुरहा ताल) हे देशातील 100 वे रामसर स्थळ म्हणून घोषित झाल्यानंतर, भारताने रामसर स्थळांचे शतक पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत आनंद व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी नमूद केले की, हे पाणथळ क्षेत्र पक्षी-जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध असून ते अनेक स्थलांतरित आणि स्थानिक पक्ष्यांना आकर्षित करते. हा उल्लेखनीय टप्पा, भारताची नैसर्गिक परिसराचे, विशेषतः अत्यंत महत्त्वाच्या पाणथळ जागांचे संरक्षण करण्याप्रति भारताची अतूट वचनबद्धता स्पष्टपणे प्रतिबिंबित करतो, यावर मोदी यांनी भर दिला.
गेल्या काही वर्षांत लोकसहभाग, विज्ञान, नवोन्मेष आणि सक्रिय जनजागृती उपक्रमांद्वारे, पाणथळ जागांचे जतन आणि पुनरुज्जीवन करण्याच्या प्रयत्नांना लक्षणीय बळकटी मिळाली आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. हे सामूहिक प्रयत्न जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी, पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी आणि भावी पिढ्यांसाठी अधिक हरित भविष्य घडवण्यासाठी महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.आहे:
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले आहे:
"रामसर स्थळांच्या बाबतीत भारताने एक शतक केले पूर्ण!
उत्तर प्रदेशातील बलिया येथील 'जय प्रकाश नारायण पक्षी अभयारण्य' (सुरहा ताल) हे भारताचे 100 वे रामसर स्थळ म्हणून घोषित झाले, याचा आनंद आहे. ही पाणथळ जागा पक्षी जैवविविधतेने समृद्ध असून, ती अनेक स्थलांतरित आणि स्थानिक पक्षांना आकर्षित करते.
आपला नैसर्गिक परिसर, आणि विशेषतः पाणथळ जागांचे रक्षण करण्याबाबतची भारताची दृढ वचनबद्धता या कामगिरीतून स्पष्टपणे दिसून येते.
गेल्या काही वर्षांत वाढता लोकसहभाग, विज्ञान, नवोन्मेष आणि सक्रिय जनजागृती उपक्रमांद्वारे, पाणथळ जागांचे जतन आणि पुनरुज्जीवन करण्याच्या प्रयत्नांना लक्षणीय बळकटी मिळाली आहे. हे प्रयत्न जैवविविधतेचे जतन करण्यासाठी, पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी आणि भावी पिढ्यांसाठी अधिक हरित भविष्य घडवण्यासाठी सहाय्य करत आहेत."
* * *
नेहा कुलकर्णी/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2269380)
आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam