महिला आणि बालविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महिला व बाल विकास मंत्रालयाने आपल्या इंटर्नशिप कार्यक्रमाच्या ऑगस्ट-सप्टेंबर सत्रासाठी अर्ज मागविले

प्रविष्टि तिथि: 04 JUN 2026 6:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 जून 2026

 

महिला आणि बाल विकास मंत्रालयाने आपल्या इंटर्नशिप कार्यक्रमांतर्गत ऑगस्ट-सप्टेंबर सत्रासाठी अर्ज मागवले आहेत. हा कार्यक्रम कोणत्याही विद्यापीठात किंवा शैक्षणिक किंवा बिगर -शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेल्या किंवा तिच्याशी संबंधित असलेल्या विद्यार्थिनी, शिष्यवृत्तीधारक, सामाजिक कार्यकर्त्या आणि शिक्षकांसाठी खुला आहे.

भारतातील नॉन  टियर-1 शहरांमधील तसेच ग्रामीण भागांमधील 21 ते 40 वर्षे वयोगटातील महिला उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. अर्ज इंटर्नशिप प्रोग्राम पोर्टलद्वारे ऑनलाइन सादर करायचे आहेत: http://wcd.intern.nic.in/.

इंटर्नशिप कार्यक्रमाबद्दल

इंटर्नशिप कार्यक्रम आर्थिक वर्षात चार सत्रांमध्ये आयोजित केला जातो: मे-जून, ऑगस्ट-सप्टेंबर, नोव्हेंबर-डिसेंबर आणि फेब्रुवारी-मार्च. प्रत्येक सत्राचा कालावधी दोन महिन्यांचा असतो. प्रत्येक सत्रासाठी, सत्र सुरू होण्याच्या दोन महिने आधी, महिन्याच्या 1 ते 10 तारखेदरम्यान अर्ज स्वीकारले जातात. एकदा निवड झालेले उमेदवार पुढील सत्रांसाठी अर्ज करण्यास पात्र नसतात.

या कार्यक्रमाचा उद्देश सहभागींना अल्पकालीन सत्रात मंत्रालयाच्या धोरणांची आणि कार्यक्रमांची ओळख करून देणे हा आहे. इंटर्न हे मंत्रालयाच्या चालू असलेल्या उपक्रमांवर लक्ष केंद्रित करून प्रायोगिक प्रकल्प किंवा सूक्ष्म-अभ्यास हाती घेऊ शकतात.

या उपक्रमाद्वारे योजनांच्या सुधारित अंमलबजावणीत योगदान देण्याची आणि धोरण प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी देऊन तरुण प्रतिभेला आकर्षित करण्याचे मंत्रालयाचे उद्दिष्ट आहे. हा कार्यक्रम शासकीय उपक्रमांवरील संशोधन आणि अर्थपूर्ण संवादालाही चालना देतो, ज्यामुळे प्रशिक्षणार्थींना अनुभवजन्य विश्लेषण, अहवाल, धोरण दस्तावेज आणि संक्षिप्त अहवालांच्या माध्यमातून योगदान देता येते.

 

* * *

सुषमा काणे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2268989) आगंतुक पटल : 18
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil