पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी सामायिक केले महर्षी पतंजली आणि योगाभ्यासाच्या गुणांचा गौरव करणारे एक संस्कृत सुभाषित
प्रविष्टि तिथि:
04 JUN 2026 9:16AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महर्षी पतंजली यांना अभिवादन करणारे आणि योगाभ्यासाच्या सखोल फायद्यांचे महत्त्व अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले. नियमित योगसाधना केल्याने शरीर सुदृढ आणि मन शांत राहते, तसेच दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवल्याने जीवन संतुलित आणि ऊर्जावान बनते, असे नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले:
" नियमित योगाभ्यासाने शरीर निरोगी आणि मन शांत राहते. त्याला आपल्या दिनचर्येचा भाग बनवल्याने जीवन संतुलित आणि ऊर्जावान बनते.
योगेन चित्तस्य पदेन वाचां
मलं शरीरस्य च वैद्यकेन।
योऽपाकरोत् तं परवरं मुनीनां
पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि॥"
योगाभ्यासाद्वारे चित्तशुद्धी, व्याकरणाद्वारे वाणीशुद्धी आणि आयुर्वेदाच्या मदतीने शरीर शुद्धी करणाऱ्या, तसेच ध्यानमग्न ऋषींमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या महर्षी पतंजली यांना मी हात जोडून वंदन करतो.
***
NehaKulkarni / ShileshPatil / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2268764)
आगंतुक पटल : 9