पंतप्रधान कार्यालय
दिल्लीतील मालवीय नगर येथील आग दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
03 JUN 2026 7:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 जून 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील मालवीय नगर येथे आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांविषयी त्यांनी सह-वेदना व्यक्त केली आहे. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली आहे. दुर्घटनेतील बाधितांना प्रशासन सर्वतोपरी सहाय्य करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
दुर्घटनेतील प्रत्येक मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाइकाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रुपये मदत दिली जाईल, तसेच जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये दिले जातील असे पंतप्रधानांनी घोषित केले.
पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावर पोस्ट केले आहे:
"दिल्लीतील मालवीय नगर येथे आग दुर्घटनेत झालेली जीवितहानी दुःखदायक आहे. दुर्घटनेत ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याविषयी मी सह-वेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना. बाधितांना प्रशासन सर्वतोपरी सहाय्य करत आहे.
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी मधून प्रत्येक मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाला 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील: PM @narendramodi"
सुवर्णा बेडेकर/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2268588)
आगंतुक पटल : 17
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam