पंतप्रधान कार्यालय
आदर्श शिक्षकाचे गुण अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांकडून सामायिक
प्रविष्टि तिथि:
01 JUN 2026 8:37AM by PIB Mumbai
काही लोक स्वतः एखादे कार्य पूर्ण करण्यात अत्यंत कुशल असतात, तर काही लोक यासाठीचे आवश्यक ज्ञान अथवा कौशल्य इतरांना शिकवण्यात विशेष पारंगत असतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ज्या व्यक्तीकडे स्वतःकडचे कौशल्य आणि इतरांना शिकवण्याची क्षमता हे दोन्ही गुण असतात, ती व्यक्ती शिक्षकांमधली सर्वश्रेष्ठ मानली जाण्यास पात्र असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
याच अनुषंगाने पंतप्रधानांनी समाजमाध्यमावर एक संस्कृत सुभाषित सामायिक केले :
श्लिष्टा क्रिया कस्यचिदात्मसंस्था सङ्क्रान्तिरन्यस्य विशेषयुक्ता।
यस्योभयं साधु स शिक्षकाणां धुरि प्रतिष्ठापयितव्य एव।।
काही लोक एखादी गोष्ट प्रत्यक्ष करण्यात तर काही जण शिकवण्यात निष्णात असतात, ज्याच्याकडे संबंधित विषयाचे स्वतःचे ज्ञान आणि ते इतरांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याची क्षमता या दोन्ही गोष्टी असतात, तेच आघाडीच्या शिक्षकांमध्ये स्थान मिळवण्यास पात्र असतात, असा या सुभाषिताचा अर्थ आहे.
पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर सामायिक केलेले सुभाषित :
श्लिष्टा क्रिया कस्यचिदात्मसंस्था सङ्क्रान्तिरन्यस्य विशेषयुक्ता।
यस्योभयं साधु स शिक्षकाणां धुरि प्रतिष्ठापयितव्य एव।।
***
NehaKulkarni / TusharPawar / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2267410)
आगंतुक पटल : 54
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam