लोकसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

संसदीय वारशाचे जतन ही लोकशाही चेतना बळकट करण्याची गुरुकिल्ली आहे: लोकसभा अध्यक्ष


भारताची लोकशाही संपूर्ण जगासाठी एक मार्गदर्शक : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

लोकशाहीची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी तथ्यांवर आधारित चर्चा आवश्यक : लोकसभा अध्यक्ष

Posted On: 28 MAY 2026 7:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 मे 2026

 

भारताची लोकशाही संपूर्ण जगासाठी एक मार्गदर्शक प्रकाश म्हणून काम करत आहे आणि संवाद, सहभाग व घटनात्मक मूल्यांच्या खोलवर रुजलेल्या आपल्या परंपरांच्या माध्यमातून अन्य राष्ट्रांना प्रेरित करत आहे असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले.

आज नवी दिल्लीत दिल्ली विधानसभेच्या ऐतिहासिक सभागृहात, केंद्रीय विधानसभा  कामकाजाच्या (1924–1930) 89 खंडांचे प्रकाशन आणि 'विधान-चेतना' या त्रैमासिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात मान्यवरांना ते  संबोधित करत होते. लोकशाही संस्थांची खरी ताकद माहितीपूर्ण संवाद, तथ्य- आधारित चर्चा आणि सक्रिय जनसहभागात अंतर्भूत आहे यावर त्यांनी भर दिला.

केंद्रीय विधानसभेचे पहिले भारतीय अध्यक्ष विठ्ठलभाई पटेल यांच्या योगदानाचे स्मरण करून बिर्ला म्हणाले की, त्यांनी संसदीय शिष्टाचार, निष्पक्षता आणि सभापतीपदाच्या प्रतिष्ठेचा भक्कम पाया रचला.

चर्चा, सर्वसहमती  आणि अर्थपूर्ण विचारविनिमय हाच  भारताच्या लोकशाही संस्कृतीचा कायम आधार राहिला आहे आणि म्हणूनच संसद व राज्यांच्या विधानसभा ही जनतेच्या आकांक्षांचे प्रतिनिधित्व करणारी सर्वोच्च व्यासपीठे म्हणून कायम राहिली पाहिजेत असे त्यांनी नमूद केले. 

शासन आणि कायदेविषयक कामकाजातील  तंत्रज्ञानाची भूमिका अधोरेखित करत बिर्ला म्हणाले की, डिजिटायझेशन, ई-विधिमंडळे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसारखे उदयोन्मुख तंत्रज्ञान धोरणनिर्मिती आणि कायदेविषयक संशोधनाला अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि सुलभ बनवत आहेत.

 

 

 

* * *

निलिमा चितळे/सुषमा काणे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2266387) अभ्यागत कक्ष : 10
Read this releasein: English , हिन्दी