वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार करारासंदर्भात चर्चा करण्यासाठी 1 ते 4 जून 2026 या कालावधीत अमेरिकेचे शिष्टमंडळ दिल्लीला येणार
प्रविष्टि तिथि:
27 MAY 2026 8:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 मे 2026
भारत आणि अमेरिका यांनी 7 फेब्रुवारी 2026 रोजी एक संयुक्त निवेदन जारी करुन परस्पर आणि एकमेकांसाठी फायदेशीर व्यापाराच्या संदर्भात अंतरिम कराराच्या आराखड्याबाबत एकमत झाल्याचे जाहीर केले. या आराखड्याने अधिक विस्तृत द्विपक्षीय व्यापार करारविषयक वाटाघाटींप्रती दोन्ही देशांच्या कटिबद्धतेला पुन्हा एकदा बळकटी दिली. त्यानुसार, भारतीय अधिकाऱ्यांनी 20 ते 23 एप्रिल 2026 या कालावधीत वॉशिंग्टन डीसी येथे जाऊन त्यांच्या अमेरिकी समकक्ष अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष भेटून बैठका घेतल्या. यावेळी झालेल्या चर्चा पुढे नेण्यासाठी प्रमुख वाटाघाटीकारांच्या नेतृत्वाखालील अमेरिकी शिष्टमंडळ येत्या 1 ते 4 जून 2026 या कालावधीत भारताला भेट देणार आहे. या भेटीदरम्यान अंतरिम कराराचे तपशील निश्चित करण्याचा तसेच विस्तृत द्विपक्षीय व्यापार कराराअंतर्गत बाजारपेठेची पोहोच, बिगर-शुल्क उपाययोजना, सीमाशुल्क आणि व्यापार सुलभीकरण, गुंतवणूक प्रोत्साहन, आर्थिक सुरक्षा संरेखन यांसारख्या विविध मुद्द्यांबाबत वाटाघाटी पुढे नेण्यात येतील असा प्रस्ताव आहे.
निलीमा चितळे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2266041)
आगंतुक पटल : 60