युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी इम्फाळ येथील राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ परिसरातील कार्याच्या प्रगतीचा घेतला; खेळाडूंशीही संवाद साधला
केंद्रीय मंत्र्यांनी खेळाडूंसह सकाळच्या फिटनेस सत्रात भाग घेतला तसेच भारताच्या पहिल्या समर्पित क्रीडा विद्यापीठाच्या विकासकार्याचा आढावा घेतला
Posted On:
25 MAY 2026 7:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 मे 2026
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज इंफाळच्या राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाला भेट दिली आणि विद्यापीठाच्या स्थायी परिसरात सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला तसेच भारताच्या या प्रमुख क्रीडा शिक्षण संस्थेशी संबंधित खेळाडू, विद्यार्थी,प्रशिक्षक आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्या क्षेत्रातील क्रीडा व्यवस्थेचा आढावा घेण्याच्या मंत्र्यांच्या कामाचा भाग म्हणून खडसे यांनी भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (एसएआय) इंफाळ येथील राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राला (एनसीओसी) देखील भेट दिली.
केंद्रीय मंत्री खडसे आज पहाटे खेळाडूंच्या दैनंदिन प्रशिक्षण सत्रात सहभागी झाल्या आणि त्यांनी खेळाडूंसह फिटनेस तसेच कंडिशनिंग व्यायाम प्रकारांमध्ये भाग घेतला. वॉर्मअप प्रशिक्षणे, सहनशक्ती वाढवण्याविषयीचे प्रशिक्षण, स्ट्रेचिंग व्यायामप्रकार, हालचालीशी संबंधित दिनचर्या आणि क्रीडाप्रकार-विशिष्ट सराव सत्रे यांचे निरीक्षण करताना त्यांनी खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्याशी संवाद साधला. खेळाडूंनी दाखवलेला समर्पणभाव आणि शिस्त यांची प्रशंसा करत केंद्रीय मंत्र्यांनी त्यांना उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील राहण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय मंचांवर देशाचा गौरव वाढवण्यासाठी प्रोत्साहित केले.
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी इंफाळच्या पश्चिम भागात, कौत्रूक येथे असलेल्या राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या स्थायी परिसरात सुरु असलेल्या बांधकामाचा तसेच पायाभूत सुविधा विकास कार्यांचा तपशीलवार आढावा घेतला. सुमारे 325 एकरांवर पसरलेल्या या परिसरातील कामे पूर्ण होत आली असून सुमारे 95 टक्के काम पूर्ण होत आले आहे. या परिसरातील प्रशासकीय इमारत, स्मार्ट वर्ग आणि प्रयोगशाळा, वाचनालय, प्रेक्षागार, क्रीडा विज्ञान सुविधा तसेच सुमारे 1,300 विद्यार्थ्यांची आणि 60 शिक्षकांची सोय होऊ शकेल असे निवासी वसतिगृह सुसज्ज शैक्षणिक संकुले यांसह तेथे विकसित होत असलेल्या प्रमुख सुविधांचा आढावा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतला.
राधिका अघोर/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2265131)
अभ्यागत कक्ष : 12