शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सीबीएसईला तांत्रिक आव्हानांना तोंड द्यायला मदत करण्यासाठी आयआयटी तज्ज्ञांचा सल्ला  घेण्याचे दिले निर्देश


आयआयटीचे पथक या वर्षाच्या परीक्षोत्तर पुनर्मूल्यांकन सेवांच्या घोषणेपासून समोर आलेल्या सर्व तांत्रिक अडचणींची करणार तपासणी

Posted On: 24 MAY 2026 4:45PM by PIB Mumbai


सीबीएसईच्या निकालोत्तर सेवा पोर्टलबाबत विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित केलेल्या चिंता आणि अलीकडील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 'केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईला त्रुटीमुक्त पुनर्मूल्यांकन प्रक्रिया ठरवण्यात मदत करण्यासाठी 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास' इथल्या प्राध्यापक आणि तांत्रिक तज्ज्ञांचे एक पथक नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत.

सीबीएसईच्या परीक्षोत्तर सेवा पोर्टलमध्ये तांत्रिक समस्या येत असल्याच्या तक्रारींनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

आयआयटी मद्रासचे तज्ज्ञ पथक प्रणाली आणि तांत्रिक कार्यप्रवाहांमध्ये लक्ष्यित तांत्रिक सुधारणा करेल आणि विशेषतः पोर्टलची स्थिरता आणि सर्व्हरच्या कार्यक्षमतेची तपासणी करेल. हे पथक एकूणच आयटी पायाभूत सुविधांच्या  भक्कमपणाचीही तपासणी करेल आणि लॉगिन पडताळणी, वापकर्ता प्रवेश प्रणाली आणि पेमेंट गेटवे निर्दोष आणि व्यवस्थित आहेत याची खात्री करण्यासाठी सुधारात्मक पावले उचलायला मदत करेल.

विद्यार्थ्यांचे हित सर्वात महत्वाचे असून पारदर्शक, कार्यक्षम आणि विद्यार्थी-स्नेही  प्रणाली तयार करण्यासाठी सीबीएसईने सर्व आवश्यक सुधारात्मक उपाययोजना प्राधान्याने करणे गरजेचे आहे, याचा प्रधान यांनी पुनरुच्चार केला.

***

सुषमा काणे/निखिलेश चित्रे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2264787) अभ्यागत कक्ष : 23