सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नशा मुक्ती मित्र: नशा मुक्त भारत अभियानासाठी  ठरला  एक निर्णायक टप्पा. प्रत्येक नागरिकाने अंमली पदार्थ विरोधी  लढ्यात सक्रिय सहभाग घेण्याचे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे आवाहन

Posted On: 15 MAY 2026 5:39PM by PIB Mumbai

 

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने देशभरातील सर्व नागरिकांना नशा मुक्ती मित्र बनण्याचे आणि नशा मुक्त भारत अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. अनेक प्रगत वैशिष्ट्यांचा वापर करुन  विकसित केलेल्या नशा मुक्त भारत अभियान ऍप  2.0 मुळे  अंमली पदार्थ मुक्त भारतात योगदान देण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला नशा मुक्ती मित्र बनणे सोपे, सहजशक्य आणि परिणामकारक  झाले आहे.

ठळक वैशिष्ट्ये:

  • सुमारे 28,000 नशा मुक्ती मित्रांनी याआधीच नोंदणी केली असून ते जनजागृतीपर कार्यक्रम, समुपदेशनाच्या माध्यमातून आधार देणे, लवकर निदान आणि पुनर्वसन प्रक्रियेत सहाय्य अशा विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन त्यांचे उल्लेखनीय योगदान देत आहेत.
  • कोणतीही व्यक्ती, वय, व्यवसाय किंवा पार्श्वभूमी विचारात न घेता आता नशा मुक्त भारत अभियान अ‍ॅप  2.0 चा वापर करुन नशा मुक्ती मित्र म्हणून नोंदणी करु शकते.
  • यशस्वी नोंदणी केल्यानंतर, मित्रांना एक अधिकृत मान्यता प्रमाणपत्र तसेच प्रतिष्ठेचा एनएमबीए बॅज मिळेल, जो या कार्याप्रती त्यांची वचनबद्धता दर्शवतो.
  • हा मंच सर्वांसाठी खुला आहे.

सर्वसामान्य नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे नशा मुक्त भारत अभियानाला एक अभूतपूर्व गती मिळेल असा सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाचा विश्वास आहे. अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे स्वतः व्यक्ती, कुटुंब आणि संपूर्ण समाज उद्ध्वस्त होतो. नशा मुक्ती मित्र बनल्यामुळे नागरिक अंमली पदार्थांच्या गैरवापराला प्रतिबंध घालण्यात, जनजागृती करण्यात, बाधित कुटुंबांना आधार देण्यात आणि या धोक्याविरुद्ध एक मजबूत सामाजिक कवच निर्माण करण्यात थेट भूमिका बजावू शकतात.

नशा मुक्ती मित्र कसे बनता येईल:

1. गुगल प्ले स्टोअरवरून एनएमबीए ॲप 2.0 डाउनलोड करा.

2. ॲपवर नोंदणी करा आणि नशा मुक्ती मित्रासाठी सोपी नावनोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.

3. आपले डिजिटल प्रमाणपत्र आणि एनएमबीए बॅज मिळवा.

4. आपल्या परिसरात जनजागृती उपक्रम, सामुदायिक संपर्क आणि सहाय्यकारक  उपक्रमांद्वारे योगदान देण्यास सुरुवात करा.

अधिक माहितीसाठी, एनएमबीएच्या अधिकृत संकेतस्थळाला  भेट द्या किंवा एनएमबीए ॲप 2.0 डाउनलोड करा.

***

निलिमा चितळे/भक्ती सोनटक्के/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2261557) अभ्यागत कक्ष : 12