पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात मधील सोमनाथ मंदिरात महापूजा आणि कुंभाभिषेक केला

Posted On: 11 MAY 2026 3:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 मे 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील सोमनाथ मंदिरात महापूजा आणि कुंभाभिषेक केला.

पंतप्रधान म्हणाले की हे आपले भाग्य असून आपल्या आयुष्यातील अत्यंत भावनिक आणि अविस्मरणीय क्षणांपैकी हा एक क्षण आहे. सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या सोहळ्यानिमित्त भगवान शंकराची पूजा करणे हा एक कधीही न विसरता येणारा अनुभव असून देवाचे दर्शन आणि पूजन हे अपरिमित अध्यात्मिक ऊर्जेचे उगमस्थान आहे.

पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट्स मध्ये लिहिले आहे:

सोमनाथच्या भव्य आणि दिव्य पवित्र भूमीवर महादेवाच्या चरणी महापूजा आणि कुंभाभिषेक करण्याचे परम सौभाग्य लाभणे, हा जीवनातील सर्वात भावनिक आणि अविस्मरणीय क्षणांपैकी एक आहे. ईश्वर रुपी  जनतेचे स्मरण करत, महादेवाचे दर्शन आणि पूजन करण्याची ही अलौकिक संधी हृदयाला असीम आध्यात्मिक ऊर्जा, भक्ती आणि शिवमय चेतनेने भारावून टाकणारी ठरली आहे.

पुनर्निर्मित सोमनाथ मंदिराच्या उद्घाटनाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या विशेष प्रसंगी महादेवाची पूजा  करणे, हा एक असा अनुभव आहे जो मी कधीही विसरणार नाही. महादेवाचे दर्शन आणि पूजा हे अमर्याद आध्यात्मिक ऊर्जेचे उगमस्थान आहे.”

सुषमा काणे/वैभवी जोशी/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2259857) अभ्यागत कक्ष : 13