संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण राज्यमंत्र्यांनी नवी दिल्ली येथे 'एआयओएस - आर्मड फोर्सेस ऑप्थॅल्मोलॉजी अपडेट 2026' चे केले उद्घाटन

Posted On: 09 MAY 2026 5:59PM by PIB Mumbai

 

संरक्षण राज्यमंत्री  संजय यांनी  आज - 09 मे 2026 रोजी नवी दिल्ली येथे 'एआयओएस–आर्मड फोर्सेस ऑप्थॅल्मोलॉजी अपडेट 2026' चे उद्घाटन केले. या  दोन दिवसीय परिषदेचे आयोजन  नवी दिल्लीच्या  आर्मी हॉस्पिटल (रिसर्च अँड रेफरल),  नेत्ररोग विभाग आणि ऑल-इंडिया ऑप्थॅल्मोलॉजी सोसायटी (एआयओएस) यांनी संयुक्तपणे  केले.  'आर्मड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेस'साठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे, कारण या निमित्ताने लष्करी नेत्ररोग तज्ज्ञ तसेज भारत  आणि  परदेशातील नागरी क्षेत्रातील नामवंत  नेत्रतज्ज्ञ,  अत्याधुनिक नेत्र संशोधन, नाविन्य आणि वैद्यकीय चिकित्सेमधील उत्कृष्टतेसाठी एका सामायिक शैक्षणिक व्यासपीठावर एकत्र आले आहेत.

उपस्थितांना संबोधित करताना संरक्षण राज्यमंत्र्यांनी सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा (एएफएमएस), आर्मी मेडिकल कोअर आणि ऑल-इंडिया ऑप्थॅल्मोलॉजी सोसायटीच्या समर्पित प्रयत्नांचे आणि राष्ट्राविषयी असलेल्या त्यांच्या निःस्वार्थ सेवेचे कौतुक केले. 'नर सेवा नारायण सेवा' या भावनेवर भर देत त्यांनी राष्ट्र उभारणी आणि मानवतावादी सेवेतील डॉक्टर आणि आरोग्य सेवा व्यावसायिकांच्या उदात्त भूमिकेवर प्रकाश टाकला.

 

या कार्यक्रमादरम्यान, संरक्षण राज्यमंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले नेत्ररोग तज्ज्ञ प्रोफेसर हरमिंदर सिंग दुआ (युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगहॅम, युनायटेड किंगडम) यांचा सत्कार केला. प्रोफेसर दुआ हे कॉर्नियल सायन्समधील त्यांच्या अग्रगण्य कार्यासाठी आणि 'दुआ लेअर'च्या शोधासाठी प्रसिद्ध आहेत. तसेच सिंगापूरचे डॉ. कॉलिन सियांग हुई टॅन यांचाही सत्कार करण्यात आला. डॉ. सियांग हे  रेटिनल इमेजिंग आणि एआय  आधारित नेत्र निदानामधील तज्ज्ञ आहेत.

सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेच्या महासंचालक, व्हाइस ऍडमिरल आरती सरिन यांनी आपल्या भाषणात लष्करी औषधशास्त्राचा दर्जा उंचावण्यासाठी संशोधन आणि शैक्षणिक सहकार्याच्या महत्त्वाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. ' एआयओएस - आर्मड फोर्सेस ऑप्थॅल्मोलॉजी अपडेट 2026' ही परिषद देशातील नेत्ररोग परिषदांसाठी एक नवीन मापदंड प्रस्थापित करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या उद्घाटन प्रसंगी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश के. त्रिपाठी, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग आणि संरक्षण मंत्रालयाचे सचिव  राजेश सिंग उपस्थित होते.

***

सुवर्णा बेडेकर/शैलेश पाटील/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2259435) अभ्यागत कक्ष : 13