संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय लष्करासाठी पाच ग्राउंड-बेस्ड मोबाईल इलेक्ट्रॉनिक सिस्टीमकरिता संरक्षण मंत्रालयाने बीईएलसोबत 1,476 कोटी रुपयांच्या करारावर केली स्वाक्षरी

प्रविष्टि तिथि: 05 MAY 2026 4:24PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 मे 2026

 

संरक्षण मंत्रालयाने भारतीय लष्करासाठी किमान पाच ग्राउंड-बेस्ड मोबाईल इलेक्ट्रॉनिक सिस्टीमच्या खरेदीसाठी हैदराबाद येथील भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडसोबत 1476 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. या प्रणालीत 72% स्वदेशी घटकांचा वापर करण्यात येणार आहे. 'बाय (इंडियन-इंडिजेनसली डिझाइन्ड, डेव्हलप्ड अँड मॅन्युफॅक्चर्ड)' या श्रेणीअंतर्गत करण्यात आलेल्या या करारावर 5 मे 2026 रोजी नवी दिल्लीतील कर्तव्य भवन-2 येथे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली.

ही प्रणाली भारतीय लष्कराच्या युनिट्सचे  आधुनिकीकरण करेल तसेच देशातील स्वदेशी संरक्षण उत्पादन परिसंस्थेला अधिक बळकट करेल. हा करार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची संरक्षण क्षेत्रातील 'आत्मनिर्भर भारत' आणि 'मेक-इन-इंडिया'प्रती असलेली वचनबद्धता अधिक दृढ करतो.

 

* * *

सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2258033) आगंतुक पटल : 45
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Telugu