पंतप्रधान कार्यालय
डॉ. आर. बालसुब्रमण्यम आणि डॉ. जोराम अनिया यांची नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
02 MAY 2026 10:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 मे 2026
डॉ. आर. बालसुब्रमण्यम जी आणि डॉ. जोराम अनिया जी यांची नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या दोन्ही व्यक्तिमत्वांचा विविध विषयांवरील दांडगा अनुभव आणि त्याबाबतची त्यांची सखोल समज यामुळे धोरणनिर्मितीला मोठे बळ मिळेल असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. त्यांचे योगदान विविध क्षेत्रांमधील नवोन्मेष आणि विकासाला गती देण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे. यानिमीत्ताने पंतप्रधानांनी त्यांचा आगामी कार्यकाळ अत्यंत फलदायी आणि परिणामकारक ठरो यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
यासंदर्भात पंतप्रधानांनी X या समाजमाध्यमावर सामायिक केलेला संदेश:
"डॉ. आर. बालसुब्रमण्यम जी आणि डॉ. जोराम अनिया जी यांची नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. त्यांचा समृद्ध अनुभव आणि विविध विषयांची सखोल समज धोरणनिर्मितीला मोठे बळ देईल. त्यांचे योगदान विविध क्षेत्रांमधील नवोन्मेष आणि प्रगतीला चालना देण्यासाठी उपयुक्त ठरेल असा मला विश्वास आहे. त्यांचा आगामी कार्यकाळ अत्यंत फलदायी आणि प्रभावी ठरो यासाठी त्यांना शुभेच्छा."
* * *
सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2257595)
अभ्यागत कक्ष : 111
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam