संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह नवी दिल्ली येथे इटलीचे संरक्षण मंत्री गुइडो क्रोसेटो यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार

Posted On: 29 APR 2026 3:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 एप्रिल 2026

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 30 एप्रिल 2026 रोजी नवी दिल्ली येथे इटलीचे संरक्षण मंत्री गुइडो क्रोसेटो यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. या बैठकीदरम्यान, हे नेते दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. बदलत्या सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, ते प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही आपला दृष्टिकोन मांडतील अशी अपेक्षा आहे.

संरक्षण मंत्र्यांनी  ऑक्टोबर 2023 मध्ये रोमला दिलेल्या भेटीनंतर भारत आणि इटली यांच्यातील संरक्षण सहकार्याला आणखी गती मिळाली. इटलीचे संरक्षण मंत्री क्रोसेटो यांचा हा पहिलाच भारत दौरा असून, तो परस्परांबरोबरचे सध्याचे सहकार्य आणखी वाढवण्याची आणि विशेषत: औद्योगिक भागीदारी क्षेत्रात सहकार्याची नवी क्षेत्रे शोधण्याची दोन्ही देशांची इच्छा अधोरेखित करतो.

जानेवारी 2026 मध्ये भारत-युरोपियन युनियन यांच्यात झालेला संरक्षण आणि धोरणात्मक भागीदारीबाबतचा करार, वाढत्या धोरणात्मक अभिसारणाचा निदर्शक असून, यामुळे परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये संरक्षण-औद्योगिक सहकार्याला आणखी चालना मिळाली.

 

* * *

शैलेश पाटील/राजश्री आगाशे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2256592) अभ्यागत कक्ष : 16