सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
अंमली पदार्थांच्या मागणीत घट करण्यासाठी राष्ट्रीय कृती योजना (एन ए पी डी डी आर) अंतर्गत देखरेख आणि संस्थात्मक समन्वय मजबूत करण्यासाठी सुरू केले जाणार नशामुक्त भारत अभियान (एन एम बी ए) ऍप 2.0
Posted On:
24 APR 2026 7:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 एप्रिल 2026
नशामुक्त भारत अभियान (एन एम बी ए) हे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाने 15 ऑगस्ट 2020 रोजी सर्वाधिक असुरक्षित ठरलेल्या 272 जिल्ह्यांमध्ये सुरू केले होते आणि 15 ऑगस्ट 2023 पासून देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये त्याचा विस्तार करण्यात आला. नशामुक्त भारत अभियानाचा उद्देश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचून मादक पदार्थांच्या सेवनाबद्दल जागरूकता पसरवणे हा आहे.
आतापर्यंत देशभरात शैक्षणिक संस्थांसह विविध स्तरांवर आयोजित केलेल्या 8.3 लाखांहून अधिक उपक्रमांच्या माध्यमातून 9.5 कोटींहून अधिक तरुण, 6.47 कोटींहून अधिक महिला आणि 28,000 हून अधिक मास्टर स्वयंसेवकांसह 26 कोटींहून अधिक लोकांना मादक पदार्थांच्या वापराबाबत संवेदनशील करण्यात आले आहे.
अंमली पदार्थांची मागणी कमी करण्यासाठीच्या राष्ट्रीय कृती योजनेच्या (एन ए पी डी डी आर) देखरेख आणि अंमलबजावणीची चौकट अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असून सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय सुधारित 'नशामुक्त भारत अभियान' (एन एम बी ए) ऍप 2.0 सादर करणार आहे. हे सुधारित ऍप्लिकेशन राज्ये/जिल्हे आणि इतर संबंधित घटकांसाठी एक केंद्रीकृत डिजिटल साधन म्हणून तयार करण्यात आले आहे, जेणेकरून राष्ट्रीय, राज्य, जिल्हा आणि संस्थात्मक स्तरावरील अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांमध्ये रिअल-टाइम रिपोर्टिंग, देखरेख आणि समन्वय सुलभ होईल. ही सुधारित आवृत्ती विद्यमान क्षमतांवर आधारित असून, पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि डेटा-आधारित प्रशासनाला चालना देण्याच्या उद्देशाने यात नवीन वैशिष्ट्ये सादर करण्यात आली आहेत.
या ऍपमध्ये मास्टर स्वयंसेवकांना (नशामुक्ती मित्र) सामील करून घेण्यासाठी आणि त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी एक सोपी प्रणाली आहे आणि यामुळे संस्थांना त्यांच्या जनजागृतीचा भाग म्हणून शपथविधी उपक्रम आयोजित करता येतात. याव्यतिरिक्त, यात व्यसनमुक्ती हेल्पलाइन आणि मानस हेल्पलाइन यांसारख्या महत्त्वाच्या हेल्पलाइन क्रमांकांवर पोहोचता येते, ज्यात व्यसनमुक्ती आणि मानसिक आरोग्य सहाय्य सेवांचा समावेश आहे, तसेच मूलभूत तांत्रिक सहाय्यासाठी संपर्क क्रमांकही उपलब्ध आहेत.
* * *
शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2255413)
अभ्यागत कक्ष : 13