युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडवीय आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली श्रीनगर येथे दिनांक 24 ते 26 एप्रिल 2026 या कालावधीत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्यांच्या चिंतन शिबीराचे आयोजन

Posted On: 23 APR 2026 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 एप्रिल 2026

 

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयातर्फे जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर येथील शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय अधिवेशन केंद्रात (एसकेआयसीसी) दिनांक 24 ते 26 एप्रिल 2026 या कालावधीत देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्यांच्या तीन दिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ.मनसुख मांडवीय तसेच केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखील खडसे यांच्या नेतृत्वाखाली हे शिबीर होणार आहे.

सुधारित केंद्र-राज्य सहयोग, धोरण संरेखन आणि संस्थात्मक समन्वयाच्या  माध्यमातून क्रीडा विषयक प्रशासन आणि युवा विकास आराखडा आणखी मजबूत करण्याच्या उद्देशाने संरचित चर्चा करण्यासाठीचा उच्च-स्तरीय मंच म्हणून या चिंतन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरातील चर्चांमध्ये खेलो इंडिया अभियानांतर्गत पदक विषयक व्यूहरचना आणि क्रीडापटूंच्या विकासाचे मार्ग यांच्यावर लक्ष्यित चर्चांसह, देशातील क्रीडाविषयक परिसंस्था बळकट करणे, प्रस्तावित खेलो भारत नीतीच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य यांच्यातील समन्वय सुधारणे आणि प्रतिभा ओळखण्यासाठी तसेच मुलभूत पातळीवर क्रीडा विकासासाठी यंत्रणांमध्ये प्रगती करणे या मुद्द्यांवर अधिक भर दिला जाईल. क्रीडा प्रशासन, स्वच्छ आणि सुरक्षित खेळांना चालना तसेच सशक्त क्रीडा साधने निर्मिती परिसंस्थेचा विकास अशा विषयांवर देखील या शिबिरात चर्चा होईल.  

खेळांसह या शिबिरात युवा व्यवहार क्षेत्राबाबत देखील व्यापक चर्चा करण्यात येईल. यासंदर्भात सहभागाचा विस्तार, वितरण आराखड्यात सुधारणा आणि संस्थात्मक प्रभावात वाढ अशा घटकांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येईल. शिबिरात आयोजित चर्चांमध्ये वार्षिक कृतियोजना 2026-27, मुलभूत स्तरावरील युथ क्लब परिसंस्थेचे बळकटीकरण, आणि माय भारत पोर्टलच्या माध्यमातून डिजिटल सहभागात वाढ याबाबतच्या चर्चांचा समावेश असेल. नेतृत्व विकास, स्वयंसेवा, अनुभवात्मक शिक्षण आणि नशा मुक्ती अभियानासारखे तरुणांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येणारे उपक्रम अशा महत्त्वाच्या संकल्पनांवर देखील विचारविनिमय करण्यात येईल.

“संवाद से समाधान”, “समाधान से संकल्प” आणि “आत्मावलोकन” यांच्या संकल्पनात्मक आराखड्याभोवती हा तीन दिवसीय कार्यक्रम गुंफण्यात आला असून त्याद्वारे संवाद, परस्पर शिक्षण आणि कृती-आधारित परिणाम साध्य करणे शक्य होणार आहे. समग्र सहभागाला चालना देण्याच्या उद्देशाने या शिबिरात योग सत्रे, फिट इंडिया सायक्लोथॉन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा देखील समावेश करण्यात येईल. तसेच या कार्यक्रमात राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनांमध्ये अनौपचारिक सल्लामसलतींच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील.

 

* * *

निलिमा चितळे/संजना चिटणीस/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2255047) अभ्यागत कक्ष : 11