पोलाद मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पोलाद मंत्रालयाच्या वतीने पोलाद आयातविषयक मुद्द्यांवर 27 एप्रिल रोजी 'ओपन हाऊस' चे आयोजन.

Posted On: 22 APR 2026 10:09AM by PIB Mumbai

पोलाद मंत्रालयाद्वारे पोलाद आयातीशी संबंधित समस्यांवर चर्चा करण्यासाठी 27 एप्रिल, 2026 रोजी 'ओपन हाऊस'चे आयोजन करण्यात आले आहे. हे आयोजन 'स्टील रूम, तिसरा मजला, जीपीओए-३, नेताजी नगर, नवी दिल्ली' येथे होणार आहे. संबंधित कंपन्या आणि संघटना या ओपन हाऊसमध्ये आपल्या समस्या मांडू शकतात. या ओपन हाऊसमध्ये सहभागी होण्यासाठी आणि भेटीची निश्चित वेळ मिळवण्यासाठी tech-steel[at]nic[dot]in या ईमेल वर संपर्क साधता येईल.

ईमेल पाठवताना खालील माहिती देणे आवश्यक आहे:

1. कंपनी/संस्थेचे नाव
1. उद्योगाचा आणि उत्पादनाचा प्रकार (उदा. ऑटोमोबाईल/एरोस्पेस/टेलिकॉम/संरक्षण इ.)
3. समस्या कशाशी संबंधित आहे (SIMS/SARAL SIMS/QCO EXEMPTION)
4. SIMS/SARAL SIMS/QCO सवलतीसाठी केलेल्या अर्जाचा संदर्भ (असल्यास)
5. समस्येचा थोडक्यात तपशील (जास्तीत जास्त 50 शब्द)
6. सहभागी प्रतिनिधीचे नाव आणि पद (तिसऱ्या पक्षाला प्रतिनिधित्व करण्यास परवानगी नाही)
7. सहभागी प्रतिनिधीचा संपर्क तपशील (मोबाईल नंबर आणि ईमेल)

 

हे ओपन हाऊस सकाळी 11:00 ते संध्याकाळी 05:00 या वेळेत पार पडेल आणि निश्चित वेळ ईमेलद्वारे कळवण्यात येईल. नियोजनातील अडचणींमुळे थेट उपस्थित राहणाऱ्यांना प्रवेश मिळणार नाही. तसेच, जास्तीत जास्त संघटनांचा सहभाग मिळावा यासाठी प्रत्येक संस्थेकडून केवळ एका प्रतिनिधीलाच उपस्थित राहण्याची परवानगी असेल.
ज्या कंपन्यांना किंवा संघटनांना पोलाद आयातीबाबत SIMS/SARAL SIMS/QCO सवलतीशी संबंधित काही समस्या असतील, त्यांनी भेटीची निश्चित वेळ मिळवण्यासाठी 24 एप्रिल रोजी दुपारी 03:00 वाजेपर्यंत वरील ईमेलवर आपला विनंती अर्ज पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

***

NehaKukarni / VaibhavJoshi / DineshYadav
 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2254398) अभ्यागत कक्ष : 18