वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मार्च 2026 मध्ये आठ प्रमुख उद्योगांच्या निर्देशांकात घट (आधार वर्ष: 2011-12=100)

प्रविष्टि तिथि: 20 APR 2026 7:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 एप्रिल 2026

 

आठ प्रमुख उद्योगांच्या एकत्रित  निर्देशांकात मार्च 2025 च्या निर्देशांकाच्या तुलनेत, मार्च  2026 मध्ये 0.4 टक्क्यांनी (तात्पुरती) घट झाली. मार्च 2026 मध्ये खते, कच्चे तेल, कोळसा आणि वीज यांच्या उत्पादनात नकारात्मक वाढ नोंदवली गेली. वार्षिक निर्देशांक, मासिक निर्देशांक आणि वाढीच्या दरांचा तपशील परिशिष्ट I आणि परिशिष्ट II मध्ये  दिलेला आहे.

या आठ प्रमुख उद्योगांचा निर्देशांक (आयसीआय) कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट आणि वीज या आठ प्रमुख उद्योगांच्या उत्पादनाच्या एकत्रित आणि वैयक्तिक कामगिरीचे मोजमाप करतो.

फेब्रुवारी 2026 साठी आठ प्रमुख उद्योगांच्या निर्देशांकाचा अंतिम वाढीचा दर 2.8 टक्के इतका होता. मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत, एप्रिल ते मार्च 2025-26 या कालावधीतील आयसीआयचा एकत्रित वाढीचा दर 2.6 टक्के (तात्पुरता) आहे.

आठ प्रमुख उद्योगांच्या निर्देशांकाचा सारांश खालीलप्रमाणे आहे:

कोळसा - कोळसा उत्पादनात मार्च 2025 च्या तुलनेत मार्च 2026 मध्ये 4.0 टक्क्यांनी घट झाली.  एप्रिल ते मार्च  2025-26 या कालावधीत मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत त्याच्या एकत्रित निर्देशांकात 0.5 टक्क्यांनी घट झाली.

कच्चे तेल - कच्च्या तेलाच्या उत्पादनात मार्च 2025 च्या तुलनेत मार्च 2026 मध्ये  5.7 टक्क्यांनी घट झाली.  एप्रिल ते मार्च 2025-26 या कालावधीत मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत एकत्रित निर्देशांकात 2.8 टक्क्यांनी घट झाली.

नैसर्गिक वायू – मार्च 2025 च्या तुलनेत मार्च 2026 मध्ये नैसर्गिक वायूच्या उत्पादनात 6.4 टक्क्यांनी वाढ झाली. एप्रिल ते मार्च 2025-26 या कालावधीत, मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत, नैसर्गिक वायुचा संचयी निर्देशांक 2.8 टक्क्यांनी घटला.

पेट्रोलियम शुद्धीकरण उत्पादने - मार्च 2025 च्या तुलनेत मार्च 2026 मध्ये पेट्रोलियम शुद्धीकरण उत्पादनांत 0.1 टक्क्यानी वाढ झाली. मागील वर्षाच्या एप्रिल ते मार्च 2025-26 या कालावधीच्या तुलनेत, याचा संचयी निर्देशांक 0.1 टक्क्यांनी घटला.

खते - खतांचे उत्पादन: मार्च 2025  च्या तुलनेत मार्च 2026  मध्ये 24.6 टक्क्यांनी घटले. एप्रिल ते मार्च 2025-26 या कालावधीत, मागील वर्षाच्या तुलनेत, याचा निर्देशांक 0.1 टक्क्यांनी घटला.

पोलाद - पोलादाचे उत्पादन मार्च 2025  च्या तुलनेत मार्च 2026 मध्ये 2.2 टक्क्यांनी वाढले. एप्रिल ते मार्च 2025 -26 या कालावधीत, मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत, हा निर्देशांक 9.1 टक्क्यांनी वाढला.

सिमेंट - सिमेंटचे उत्पादन मार्च 2025 च्या तुलनेत मार्च 2026 मध्ये 4.0 टक्क्यांनी वाढले. एप्रिल ते मार्च 2025 -26 या कालावधीत, मागील वर्षाच्या या कालावधीच्या तुलनेत, हा निर्देशांक 8.6 टक्क्यांनी वाढला.

वीज - मार्च 2025 च्या तुलनेत मार्च 2026 मध्ये वीज निर्मिती 0.5 टक्क्यांनी घटली. एप्रिल ते मार्च 2025 -26 या कालावधीत, मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत, हा निर्देशांक 0.9  टक्क्यांनी वाढला.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

* * *

राधिका अघोर/सुषमा काणे/राजेश शिरभाते/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2253914) आगंतुक पटल : 49
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati