गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शीख धर्माचे दुसरे गुरू, श्री गुरु अंगद देव जी यांच्या प्रकाश पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या
गुरू अंगद देव जी यांनी सेवा, भक्ती आणि समाजसुधारणेला आपल्या जीवनाचा मुख्य आधार बनवले,
गुरुमुखी लिपीच्या विकासाद्वारे त्यांनी शीख धर्माचा प्रचार-प्रसार केला आणि लंगर परंपरेच्या माध्यमातून समता व एकतेचा मंत्र दिला,
त्यांची शिकवण आजही आपल्याला सत्य, निष्ठा आणि मानवतेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते,
प्रविष्टि तिथि:
18 APR 2026 11:06AM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शीख धर्माचे दुसरे गुरू, श्री गुरु अंगद देव जी यांच्या प्रकाश पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
एक्स या सामाजिक माध्यमावरील एका संदेशात शाह म्हणाले की,
गुरू अंगद देव जी यांनी सेवा, भक्ती आणि समाजसुधारणेला आपल्या जीवनाचा मूळ आधार बनवले. त्यांनी गुरुमुखी लिपीच्या विकासाद्वारे शीख धर्माचा प्रचार-प्रसार केला आणि लंगर परंपरेच्या माध्यमातून समता व एकतेचा मंत्र दिला. त्यांची शिकवण आजही आपल्याला सत्य, निष्ठा आणि मानवतेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते. शीख धर्माचे दुसरे गुरू, श्री गुरु अंगद देव जी यांच्या प्रकाश पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा.
***
यश राणे/राज दळेकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2253212)
आगंतुक पटल : 35