आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नवी दिल्ली येथे 2026 च्या पहिल्या 'ब्रिक्स'आरोग्य कार्यगटाच्या बैठकीचे आयोजन केले


"लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी" ही ब्रिक्स 2026 ची मार्गदर्शक संकल्पना, 'लोक-केंद्रित' आणि 'भविष्यासाठी सज्ज' दृष्टिकोन प्रतिबिंबित करेल

भारताच्या अध्यक्षतेखालील ‘ब्रिक्स’ परिषदेत, क्षयरोग संशोधन नेटवर्क आणि पुरावा-आधारित पारंपरिक वैद्यकशास्त्र, यासारखे प्राधान्यक्रम, 'धोरणात्मक केंद्रबिंदू' म्हणून कायम राहणार

Posted On: 15 APR 2026 9:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 एप्रिल 2026

भारत सरकारच्या केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अध्यक्षतेखाली, नवी दिल्ली येथे 2026 या वर्षासाठीच्या 'ब्रिक्स' चौकटी अंतर्गत पहिल्या आरोग्य कार्य गटाची (एचडब्ल्यूजी) बैठक आयोजित करण्यात आली होती.  या बैठकीत, ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, संयुक्त अरब अमिराती आणि इंडोनेशिया, या  ब्रिक्स सदस्य देशांचे वरिष्ठ आरोग्य अधिकारी, तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ आणि प्रतिनिधी एकत्र आले. त्यांनी सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील सहकार्याच्या प्राधान्य क्षेत्रांवर विचारविनिमय केला.

भारताच्या अध्यक्षतेखालील 2026 ची ब्रिक्स परिषद, “लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी’, या संकल्पनेवर आधारित असून, यामधून  2025 च्या रिओ शिखर परिषदेत पंतप्रधानांनी मांडलेला, लोककेंद्रित आणि मानवतेला अग्रक्रम देणारा दृष्टिकोन प्रतिबिंबित होतो. ही संकल्पना प्रतिसादात्मक, समावेशक आणि भविष्यासाठी सज्ज, सहयोगी चौकट बळकट करण्याप्रति भारताची वचनबद्धता अधोरेखित करते.

आपल्या प्रास्ताविकपर भाषणात, केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी एक महत्वाचे व्यासपीठ म्हणून आरोग्य कार्यगटाचे महत्त्व अधोरेखित केले. अलिकडच्या वर्षांत पार पडलेल्या 'ब्रिक्स' आरोग्य कार्यगटाच्या बैठकांनी संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोग, आरोग्य प्रणाली मजबूत करणे, तसेच परवडणाऱ्या औषधांची उपलब्धता वाढवणे, यासारख्या आरोग्य क्षेत्रातील तातडीच्या आव्हानांवर सहकार्याचा मार्ग मोकळा केला, असे त्यांनी नमूद केले.

2026 मधील भारताच्या अध्यक्षतेखालील प्राधान्यक्रमांवर भर देताना, त्यांनी नमूद केले की, ब्रिक्स राष्ट्रांच्या विविध आरोग्य प्रणाली आणि सामाजिक-आर्थिक संदर्भांचा विचार करून, समावेशक, शाश्वत आणि तथ्यावर आधारित आरोग्य सहकार्याला चालना देणे, हे 'आरोग्य कार्यगटा'चे उद्दिष्ट आहे.

सध्याच्या प्राधान्यक्रमांप्रति वचनबद्धतेचा पुनरुच्चार करून, केंद्रीय आरोग्य सचिवांनी भारताच्या अध्यक्षतेखाली दोन नवीन प्राधान्य क्षेत्रांचा प्रस्ताव मांडला.

· निरोगी जीवनशैलीसाठीचे ‘ब्रिक्स’ मिशन: निरोगी सवयींना प्रोत्साहन देणे आणि अस्वास्थ्यकारक आहार, शारीरिक निष्क्रियता, तंबाखूचे सेवन आणि मद्यपानाचा हानिकारक वापर यासारख्या प्रमुख जोखीम घटकांना संबोधित करणे, हे याचे उद्दिष्ट आहे. 

· मानसिक आरोग्य आणि स्वास्थ्य, याला प्रोत्साहन: मानसिक आरोग्य सेवांचे बळकटीकरण करणे, दुषित मानसिकता बदलणे आणि मानसिक आरोग्याला व्यापक सार्वजनिक आरोग्य चौकटीत सामावून घेण्यावर लक्ष केंद्रित करणे.

या बैठकीत ब्रिक्स आरोग्य कार्यगटा अंतर्गत निश्चित केलेल्या नऊ प्राधान्य क्षेत्रांवर देखील चर्चा झाली, जी सार्वजनिक आरोग्याच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी समावेशक आणि सहयोगी दृष्टिकोन प्रतिबिंबित करते. यात ‘ब्रिक्स क्षयरोग संशोधन नेटवर्क’ चा समावेश आहे.

ब्राझील,चीन, इजिप्त, इथिओपिया आणि इंडोनेशिया या देशांनी निरोगी जीवनशैली आणि  मानसिक स्वास्थ्याला  चालना देणे, तसेच पारंपरिक, पूरक आणि एकात्मिक वैद्यकीय पद्धतींचा आरोग्य प्रणालींमध्ये समावेश करणे, या नवीन प्राधान्यक्रमांना आपला ठाम पाठिंबा दर्शवला. त्यांनी ब्रिक्स क्षयरोग संशोधन नेटवर्कद्वारे क्षयरोगावरील सहकार्य वाढवण्यावर भर दिला.

निलीमा चितळे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2252373) अभ्यागत कक्ष : 16