सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
श्रमशक्ती सर्वेक्षण नियतकालिक - मासिक अहवाल (पीएलएफएस)
Posted On:
15 APR 2026 6:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 एप्रिल 2026
ठळक मुद्दे :
· मार्च, 2026 मध्ये एकूण एलएफपीआर (15+ वर्षे) 55.4% नोंदवला गेला. फेब्रुवारी, 2026 मध्ये तो 55.9% होता.
· मार्च, 2026 मध्ये महिला एलएफपीआर (15+ वर्षे) 34.4% असल्याचा अंदाज, फेब्रुवारी 2026 (35.3%) च्या तुलनेत किरकोळ घट झाली.
· मार्च, 2026 मध्ये एकूण डब्ल्यूपीआर (15+ वर्षे) 52.6% इतका राहिला.
· मार्च 2026 मध्ये शहरी डब्ल्यूपीआर (15+ वर्षे) पुरुष आणि महिला या दोघांसाठीही मुख्यतः अपरिवर्तित राहिला.
· मार्च, 2026 मध्ये एकूण यूआर (15+ वर्षे) 5.1% राहील असा अंदाज.
अ. प्रस्तावना
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (एनएसओ) वतीने केलेल्या, श्रमशक्ती सर्वेक्षणाच्या (पीएलएफएस) मासिक अहवालामध्ये, विविध उपक्रमांमधील लोकांचा सहभाग, तसेच रोजगार आणि बेरोजगारीच्या स्थितीबाबतच्या माहिती (डेटा) जमा केली आहे; ही माहिती प्राथमिक स्रोत आहे. देशातील श्रमशक्ती निर्देशकांचे मासिक आणि त्रैमासिक अंदाज उपलब्ध करून देण्यासाठी, जानेवारी 2025 पासून पीएलएफएस सर्वेक्षण पद्धतीत सुधारणा करण्यात आली.
‘पीएलएफएस’चे निष्कर्ष 'मासिक अहवाला'च्या स्वरूपात जारी केले जातात. यामध्ये चालू साप्ताहिक स्थिती (सीडब्ल्यूएस) पद्धतीचा अवलंब करून, अखिल भारतीय स्तरावर श्रम शक्ती सहभाग दर (एलएफपीआर), कामगार लोकसंख्या गुणोत्तर (डब्ल्यूपीआर) आणि बेरोजगारी दर (यूआर) यासारख्या प्रमुख श्रम बाजार निर्देशकांचे अंदाज सादर केले जातात.
एप्रिल, 2025 ते फेब्रुवारी, 2026 या कालावधीतील मासिक अहवाल यापूर्वीच प्रकाशित करण्यात आले असून, मार्च 2026 चे सध्याचे मासिक अहवाल हे या मालिकेतील बारावे आहे.
सीडब्ल्यूएस नंतर 15 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील व्यक्तींबाबतचे प्रमुख निष्कर्ष:
· शहरी श्रम शक्ती सहभाग दर एलएफपीआर) स्थिर कल दर्शवतो:
मार्च 2026 मध्ये 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींमध्ये एकूण एलएफपीआर 55.4% नोंदवला गेला. महिला कामगारांच्या एकूण सहभागात किरकोळ घट झाली.

मार्च 2026 मध्ये महिला मनुष्यबळ सहभाग दर (एलएफपीआर) 34.4% नोंदवला गेला, फेब्रुवारी, 2026 मध्ये तो 35.3% इतका होता.

शहरी डब्ल्यूपीआर पातळी स्थिर :
मार्च 2026 मध्ये शहरी भागात 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील कामगार-लोकसंख्या गुणोत्तर (डब्ल्यूपीआर) प्रामुख्याने स्थिर राहिले आहेत. मार्च 2026 मध्ये एकूण डब्ल्यूपीआर 52.6% राहील असा अंदाज होता. ग्रामीण भागात, मार्च 2026 मध्ये डब्ल्यूपीआर 55.5% इतका राहिला, फेब्रुवारी 2026 मध्ये तो 56.3% होता.



बेरोजगारी दरात (यूआर) झाली किरकोळ वाढ:
मार्च 2026 मध्ये, 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींमधील बेरोजगारीचा दर (यूआर) फेब्रुवारी 2026 मधील 4.9% वरून किंचित वाढला, आणि तो 5.1% वर पोहोचला. शहरी भागातील बेरोजगारीचा दर, हे यामागचे प्रमुख कारण होते, फेब्रुवारी 2026 मधील 6.6% वरून तो मार्च 2026 मध्ये 6.8% वर पोहोचला.

ग्रामीण भागात महिला बेरोजगारीचा दर जवळजवळ स्थिर:
मार्च 2026 मध्ये, ग्रामीण भागात 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील महिला बेरोजगारीचा दर जवळजवळ स्थिर राहिला आहे. तर याच वयोगटातील पुरुषांमध्ये, फेब्रुवारी 2026 च्या तुलनेत मार्च 2026 मध्ये बेरोजगारीचा दर किंचित अधिक होता.


सुवर्णा बेडेकर/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2252325)
अभ्यागत कक्ष : 15